बांधकामा दरम्यान एक दुस-याच्या सहकार्याने काम कारणा-या विविध संघटनासाठी फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफएसएआई) नाशिक शाखेद्वारे आयोजित आमंत्रितांच्या बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये नाशिक पेंटर्स असोसिएशन च्या संघाने विजेतेपद मिळवले . उपविजेतेपद हे आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असो च्या संघास मिळाले
हे या स्पर्धेचे तिसरे वर्ष होते .यावर्षी या स्पर्धेत असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनीअर्स, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असो., इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, नाशिक पेन्टिंग कॉन्ट्रॅक्टर असो., नाशिक फायर ब्रिगेड, नरेडको, निमा व फायर अॅण्ड सिक्युरिटी असो. यांचे संघ सहभागी झाले होते अशी माहिती सहसचिव वरूण तिवारी यांनी दिली.
मुंबई नाका येथील बॉक्स पार्क येथे सकाळी ७.३० वा स्पर्धेचे उद्घाटन एमआयडीसी चे विभागीय अधिकारी नितीन गवळी यांच्या हस्ते संपन्न झाले तर . बक्षिस वितरण समारंभासाठी पूर्व मिसेस इंटरनॅशनल डॉ नमिता कोहोक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजीव जगताप, आनंद दिक्षित, गजेंद्र जगताप, हर्षद भांबरे, मनोज कर्डिले यांच्यासह सर्व सभासद यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.