तेजस्विनी पवार यांना ‘वूमन लीडरशिप अवॉर्ड’

Advertisements

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिक शहरातील जी .एस .टी .कमिशनर ऑफिस (Appeals) तर्फे समाजातील महिला व मुलींच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला . याच अंतर्गत आशीर्वाद सेवाधाम ट्रस्टच्या एम .डी तेजस्विनी पवार यांना ‘नीट इंडिया फीट इंडिया ‘ अंतर्गत ‘वूमन लीडरशिप अवॉर्ड ‘ देऊन गौरविण्यात आले . जी .एस .टी .कमिशनर स्मिता डोळस यांचे हस्ते गौरवचिन्ह देऊन तेजस्विनी पवार यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्रबीर दास व सुनील वाडेटिवार हे उपस्थित होते .
तेजस्विनी पवार या खंबाळे ,ता .त्र्यंबकेश्वर येथे आशिर्वाद सेवाधाम ट्रस्टच्या अंतर्गत गरजू मुलींचे शिक्षण ,आरोग्य ,संरक्षण ,काळजी इ .द्वारे पुनर्वसनाचे उत्तम कार्य करत आहेत .

Leave a Reply

You cannot copy content of this page