बांधकाम क्षेत्रातील विविध संघटना झुंजणार क्रिकेट मैदानात

Advertisements

बांधकामा दरम्यान एक दुस-याच्या सहकार्याने काम कारणा-या विविध संघटना २० फेब्रुवारी रोजी एक दुस-या विरुद्ध  मैदानात झुंजणार आहेत. निमित्त आहे ते फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफएसएआई) नाशिक शाखेद्वारे येत्या २० फेब्रुवारी रोजी आयोजित आमंत्रितांच्या बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचे.

हे या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून यावर्षी या स्पर्धेत असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनीअर्स, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असो., इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, नाशिक पेन्टिंग कॉन्ट्रॅक्टर असो., नाशिक फायर ब्रिगेड, नरेडको, निमा व फायर अॅण्ड सिक्युरिटी असो. यांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती सहसचिव वरूण तिवारी यांनी दिली.

२० फेब्रुवारी रोजी मुंबई नाका येथील बॉक्स पार्क  येथे सकाळी ७.३० वा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी चे विभागीय अधिकारी नितीन गवळी हे उपस्थित राहणार आहे. तसेच त्याच दिवशी होणा-या बक्षिस वितरण समारंभासाठी पूर्व मिसेस इंटरनॅशनल डॉ नमिता कोहोक या उपस्थित राहणार आहेत.  स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजीव जगताप,  आनंद दिक्षित, गजेंद्र जगताप, हर्षद भांबरे, मनोज कर्डिले यांच्यासह सर्व सभासद सक्रीय आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page