“चितळे एक्सप्रेस” आली नाशिकमध्ये

Advertisements

गेल्या ८१ वर्षांपासून नात्यातील गोडवा जपणा-या चितळे बंधू यांच्या “चितळे एक्सप्रेस” चे नाशिक मध्ये पदार्पण झाले आहे. नाशिक मधील डोंगरे वसतिगृह मैदानासमोरील सुयोजित अवधूत टॉवर येथे असणा-या या दालनात  चितळे यांची सर्व उत्पादने एकाच छताखाली नाशिककरांना मिळतील.

आज झालेल्या कार्यक्रमात चितळे एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे व केदार चितळे, नामवंत कलाकार मंगेश कदम व लिना भागवत, जेष्ठ विधिज्ञ सुशील अत्रे, मिलिंद भालेराव उपसंचालक (साखर), जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, अरविंद कोराण्णे व अमोद एन्टरप्रायझेसचे मिलिंद कोराण्णे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. आपल्या मनोगतात बोलतांना मान्यवरांनी चितळे एक्सप्रेसच्या नाशिक मधील आगमनामुळे खवय्ये व रसिक नाशिककर सुखावले असल्याचे नमूद करून या दर्जेदार उत्पादनासाठी आता पुण्याला जाण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन केले.

चितळे एक्सप्रेसचे हे महाराष्ट्रातील १८ वे दालन असून यामध्ये चितळेंची सर्व उत्पादने जसे बाकरवडी, श्रीखंड, पेढे, दही, तूप, इन्स्टन्ट उत्पादने, गुलाबजाम, स्नॅक्स व नमकीन, ज्युसेस व लस्सी तसेच अनेक नविन उत्पादने उपलब्ध राहणार आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page