उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक 14,000 हून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याचा 19 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ.
योगेश चौधरी यांच्या नाईन पर्ल्स हॉस्पिटल येथे रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.
अत्याधुनिक थर्ड जनरेशन फुल्ली ऑटोमॅटिक (CUVIS CJ 150) रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून उतार वयात गुडघे दुखीने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे . या तंत्रज्ञानाच्या साह्याने गुडघेरोपण (सांधेरोपण) शस्त्रक्रिया करताना सांधेरोपण शस्त्रक्रियेपूर्वीच पूर्णतः नियोजन केले जात असून याचे अनेक फायदे रुग्णांना होत असतात .
पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया ही अधिक अचूक असून या मुळे गुडघ्यातील नैसर्गिक रचनांचे जतन तर होतेच सोबतच नी कायनेमॅटिक अलाइनमेंट साधल्याने नैसर्गिक हालचालीच्या मध्येही सहजता व सुलभता येते .कमीत कमी रक्तस्त्राव, छोटी जखम, कमीत कमी वेळेत शस्त्रक्रिया, जलद रिकव्हरीमुळे शस्त्रक्रिये पश्चात काही तासातच चालणे शक्य होते. रुग्णांना होणाऱ्या वेदना कमी प्रमाणात असतात व भविष्यात नैसर्गिक सांध्याप्रमाणे नियमित हालचाल करू शकतो असे डॉ योगेश चौधरी यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.
योगेश चौधरी हे गुडघे रोपणातील नॅनो टेक्नॉलॉजीचे प्रणेते असून उत्तर उत्तर महाराष्ट्रात सांधेरोपण बाबत जनजागृती करायचे काम देखील ते गेली अनेक वर्ष करत आहेत. वयोमानानुसार गुडघ्यांची झीज होते त्याला दुसरा कृत्रिम गुडघा लावण्याशिवाय पर्याय नसतो. गुडघा बदलल्यानंतर नियमित जीवनशैली जगता येते.
गुडघ्याच्या त्रासामुळे अनेकदा हालचाल कमी होते त्यामुळे स्थूलता, मधुमेह रक्तदाब असे अनेक आजार देखील उद्भवू शकतात याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी नाईन पर्ल्स हॉस्पिटलचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
