ग्लोबल वॉर्मिग मुळे वाढत्या तापमानाला सामोरे जाण्यासाठी अंबुजा सिमेंटने पोझोकूल शृंखलेची विविध उत्पादने बाजारात आणली असून या उत्पादनांच्या वापराने घरातील तापमान 15 ते 20 डिग्री से. कमी होऊ शकते होऊ शकते असा दावा कंपनी तर्फे करण्यात आला आहे.
बांधकामा साठी लागणाऱ्या विविध उत्पादनाबाबत अनेक संशोधने नियमितरीत्या होत आहेत. त्याच शृंखलेतील हा एक शोध म्हणता येईल.
पोझोकूल या सर्व उत्पादनांची निर्मिती व वितरण हे कंपनीच्या नाशिकमधील कारखान्यातून होणार असल्याची माहिती कंपनीचे नाशिक प्लान्टचे व्यवस्थापक मुनीश माथुर यांनी दिली .ते म्हणाले नाशिक जवळील एकलहरे येथे गेल्या 35 वर्षांपासून अंबुजा सिमेंट डर्क इंडिया हे फ्लाय अॅशद्वारे पोझीक्रेट सिमेंटचे उत्पादन करत आहेत.यामुळे 30 ते 70 टक्के काँक्रीटची बचत होतेच सोबतच बांधकामाचा दर्जा व ताकद वाढते. नेहमीच नवे काही करायचा ध्यास असल्याने बदललेल्या वातावरणाच्या अनुषंगाने कंपनीतर्फे या उत्पादनांची निर्मिती केली आहे.
या नव्या उत्पादनांमध्ये पोझोकूल ब्लॉक ,रेडी टू यूज प्रीमिक्स प्लास्टर पोझोकूल प्लास्ट,जोड पक्के करण्यासाठी पोझो जॉईंट्स व उच्च दर्जाचे अॅढेसिव्ह पोझोटाईल्स हे प्रमुख आहेत.
देशाच्या बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल करणारी ही उत्पादने नाशिकच्या प्लान्टमध्ये तयार होत असून नाशिकच्या अर्थकारण व रोजगार निर्मितीमध्ये अंबुजा सिमेंटच्या या प्लान्टचे अनन्यसाधारण महत्वअसल्याचेही त्यांनी नमूद केले.
वितरण शुभारंभप्रसंगी वरिष्ठ अभियंता सुनील कुटे तसेच क्वालिटी प्रमुख नितीन राजोळे,एरिया सेल्स मॅनेजर रवी यादव ,सेल्स ऑफिसर विलास जगताप ,सेल्स मॅनेजर सुनील चौहान,
पंकजकुमार, अदानी सिमेंटपश्चिम विभाग-2 चे सीएसओ रवींद्र राणे तसेच प्लान्टवरील कर्मचारी वृंद उपस्थित होता.
