गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेत कालसापेक्ष अनेक बदल झाले असून त्याअनुषंगाने विविध अत्याधुनिक उपकरणे, तंत्रप्रणाली व तंत्रज्ञानाचा उपयोग शस्त्रक्रियेसाठी केला जातो. आर्थोअलाईन नॅव्हीगेशन तंत्रप्रणाली, पेशंट मॅच टेक्नोलॉजी याच बरोबर संशोधनाअंती रोबोटिकच्या सहाय्याने उपयुक्त अशी तंत्रप्रणाली विकसित झालेली असून हे प्रगत तंत्रज्ञान उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटल येथे उपलब्ध झाले आहे. या नव्या रोबोटिक सांधे रोपण केंद्राचे आज उद्घाटन संपन्न आले . सुमारे १०००० हून अधिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया चा अनुभव असलेले पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटल च्या सहकार्याने या शस्त्रक्रिया होणार आहेत .
अश्या शस्त्रक्रियेसाठी अनेक रुग्ण मुंबई-पुण्या ला जात असत पण नाशिक मधील या सुविधे मुळे रुग्णाची खूप मोठी सोय होणार आहे .शुभारंभानंतर पहिल्याच महिन्यात मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटल येथे रोबोटिक सांधेरोपण तंत्राने शस्त्रक्रिये साठी ५० रुग्णानी नोंदणी केली असल्याची माहिती मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटलचे ओर्थोपेडीक व जॉइंट रिपलेसमेन्ट तज्ञ डॉ. कपिल कापडणीस व लोकमान्य हॉस्पिटल चे प्रख्यात ओर्थोपेडीक व जॉइंट रिपलेसमेन्ट तज्ञ डॉ.नरेंद्र वैद्य यांनी दिली.
नाशिक मधील मुंबई नाका स्थित शताब्दी हॉस्पिटल आता पूर्ण पणे आधुनिक स्वरुपात सुरु झाले असून त्याचे संचलन आता मेडीनोवा तर्फे होणार आहे. नाशिक मधील डॉ.अमित येवले [न्युरोफिजिशिअन], डॉ .मुकेश धांडे [न्यूरोसर्जन], डॉ. सचिन वाघ [प्लास्टिक सर्जन], डॉ .निखील भामरे [न्यूरोसर्जन], डॉ . सुमित मांदळे [फिजिशियन] व डॉ.कपिल कापडणीस [ ओर्थोपेडीक व जॉइंट रिपलेसमेन्ट तज्ञ ], या नामवंत व अनुभवी तज्ञ यांनी एकत्र येऊन मेडीनोवा ची स्थापना केली आहे.
मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटल येथे सर्व आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान हे नव्याने उभारण्यात आले असून या मध्ये सुसज्ज ओपेरेशन थिएटर, आय सी यु , कारडीएक आय सी यु , डायलिसीस अश्या प्रकारच्या सर्व सुविधा आहेत . येथे आजमितीला ७५ बेड्स उपलब्ध असून लवकरच त्याची संख्या १०० होईल . सोबतच सर्व आघाडीचा आरोग्य विमा पण येथे उपलब्ध असल्याची माहिती सेंटर हेड अनिमेष दुबे यांनी दिली .
उतारवयातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये तसेच काही प्रमाणात तरूणांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण लक्षणीय असून गुडघ्याच्या सांध्यातील दोन्ही हाडांमध्ये असलेल्या कुर्चाची झीज होऊन रूग्णास गुडघ्यामध्ये तीव्र वेदना होतात, पायात बाकही येतो. सांधेदुखीच्या पुढच्या टप्प्यात औषधे, फिजिओथेरपी किंवा आर्थोस्कोपी इत्यादी सारखे उपचार निष्प्रभ ठरतात, तेव्हा गुडघ्यावर प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया हा एकमेव यशस्वी उपचार ठरतो.
अनेक सामाजिक बदलांमुळे साठी नंतर नागरिक एकटे राहत आहेत त्यामुळे त्यांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे गुडघे रोपण केल्यास त्यांची नियमित जीवनशैली कायम राहते, चालणे फिरणे नियमितरीता होत असल्यामुळे वजन वाढणे तसेच अन्य रोगांवरही बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे.
रोबोटिक सहाय्य असलेल्या तंत्रप्रणालीची वैशिष्टये –
गुडघ्यांवरील सांधेरोपण शस्त्रक्रियेत संशोधनाच्या विकसनशील टप्प्यात नॅव्हीगेशन, जी.पी.एस. अर्थोअलाईन तंत्रज्ञानाच्या आधारे रचनात्क अंश, कोन यांच्या अचूक मोजमापाच्या अधारे सांधेबदल शस्त्रक्रिया करण्यात यश निश्चित आले आहे. पण त्याचबरोबर गुडघ्याच्या हालचालीमधील दोन हाडांमधील हालचाल हे ही अत्यंत महत्त्वाचे तत्त्व आहे. त्यास नी कायनेमेटिक असे म्हणतात. या नी कायनेमेटिक अलाईनमेंट मोजमाप करण्यातील उपलब्ध तंत्रज्ञानामध्ये नॅव्हीगेशन जी.पी.एस सारखी प्रणाली पुरेशी नाही. त्यामुळे रोबोटिकच्या सहाय्याने शस्त्रक्रियेतील तंत्रप्रणाली विकसित झाली आहे. यामुळे गुडघ्यांच्या सांध्यातील रचनेत तर अचुकता येतेच पण हालचालींच्यामध्येही नैसर्गिकता सहजता व सुलभता येते. कायनेमेटिक अलाईनमेंटमध्ये गुडघ्यातील बंध सोडवावे लागते ज्याला लिंगामेंट रिलीज असे म्हणतात. हा रोबोटिक तंत्रप्रणालीत अत्यंत कमी होतो. त्यामुळे रूग्णांना शस्त्रक्रियोत्तर होणाऱ्या वेदना, रक्तस्त्राव अत्यंत कमी होतो.