दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर तर्फे ऑउटस्टँडिंग पुरस्कारासह अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या अभियंत्यांचा वार्षिक अभियांत्रिकी पुरस्कार सोहळा काल शुक्रवार दि. २९ एप्रिल २०२२ रोजी हॉटेल द गेटवे ताज येथे आयोजित करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यास व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड चे वरिष्ठ उपाध्यक्ष (manufacturing Operations) के. जी. शेणॉय आणि हिंदुस्थान एरोनॉटिकस लिमिटेड चे सिईओ डी. मैती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर चे अध्यक्ष सुमित खिंवसरा, मानद सचिव, समीर कोठारी व इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) महाराष्ट्र स्टेट सेंटरचे अध्यक्ष महेंद्र कोठारी हे हि उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुणे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड चे वरिष्ठ उपाध्यक्ष के. जी. शेणॉय म्हणाले की, भारतीय तंत्रज्ञान आज जगात कोणापेक्षाही कमी नाही. भारत ‘इंडस्ट्री 4.0’ कडे वेगाने पुढे जात आहे. आज जगात कोठेही जेव्हा एक नवीन तंत्रज्ञान विकसित होते ते भारतात देखील तेव्हाच येते. सध्याचा काळात परिवर्तनाचा वेग खूप वाढलेला असून स्वत:ला त्वरित परिवर्तन करणे हि काळाची गरज आहे व त्याच्यासाठी दररोज नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती बाळगणे आवश्यक आहे. २०३५ पर्यंत औद्योगिक उत्पादन पूर्णपणे ३ डी प्रिंटींगनेच होईल . पुढील १० वर्षात सुपरवाईजरची संकल्पनाच संपुष्टात येईल कारण सगळे काही पूर्णपणे स्वयंचलीत असेल.
तरुण अभियंत्यांना संबोधित करतांना ते पुढे म्हणाले की, लक्ष्य अशक्य ठेवा, स्वत: वर विश्वास व सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आणि परिवर्तनासाठी सतत तयार रहा.
हिंदुस्थान एरोनॉटिकस लिमिटेड चे सिईओ डी. मैती, सर्व अभियंत्यांचे कौतुक करतांना आपल्या भाषणात म्हणाले की, उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात डीजीटायजेशन होत आहे आणि भविष्यात औद्योगिक उत्पादन पूर्णपणे ऑटोमेशन, अॅनॅलिटिक्स आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (ए आय ) वर अवलंबून राहील. आज आत्मनिर्भर भारत देशाचे ब्रीदवाक्य आहे. स्वदेशीकरणावर भर दिला जात आहे. नागरी विमान बनविण्याच्या प्रक्रियेत आज ३०९ घटक हे भारतात बनविले जातात व काही थोड्या प्रमाणातच घटक बाहेरून आयात केले जातात. याचे निरीक्षण ड्रोन द्वारा होते. आणि जे काम २ तासात व्हायचे ते आता १५ मिनिटात होते.
अभियंत्यांना आवाहन करतांना ते पुढे म्हणाले की, अभियंत्यांनी हवामान बदल कडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे अभियांत्रिकी तंत्रज्ञानाने हा गंभीर प्रश्न सोडविता येईल.
यावेळी आपल्या भाषणात बोलतांना महेंद्र कोठारी म्हणाले की, अभियांत्रिकी क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना त्यांनी स्वतःच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘आऊटस्टॅन्डींग इंजिनिअर पुरस्कार, इंजिनिअरिंग अचिव्हमेंट पुरस्कार, युवा पुरुष अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार तसेच महिला अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संस्थेच्या ह्या पुरस्कारास अभियंत्यांसाठी अत्यंत गौरवास्पद मानण्यात येतो. दि इंन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापना सन १९२० साली करण्यात आली असून आजमितीस संस्थेचे २. २ लाखाहुन अधिक कॉरपोरेट व ६. ७ लाखाहुन अधिक नॉन – कॉरपोरेट सदस्य आहेत. संस्थेचे जाळे देशभरात पसरलेले असून त्यात ९२ लोकल सेंटर आहेत तसेच ३२ हुन अधिक स्टेट सेंटर आहेत. नाशिक लोकल सेंटर ची स्थापना सन १९८४ साली करण्यात आली. आज २५०० हुन अधिक कॉरपोरेट मेंबर व सुमारे ९५०० टेक्नीशियन मेंबर नाशिक सेंटरचे सभासद आहेत. नाशिक लोकल सेंटरची सलग्नता धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांशी आहेत.
या वर्षीचा आऊटस्टॅन्डींग इंजिनिअर् पुरस्कार सिएट लिमिटेड, नाशिक चे उपाध्यक्ष (प्लांट ऑपरेशन्स) इंजि. श्रीनिवास एस. पत्की याना प्रदान करण्यात आला.
इंजिनिअरिंग अचिव्हमेंट पुरस्कार – डॉ. जयंत जी. जोशी, विजय एम. खालकर, डॉ. महादेव डी कोकाटे, संग्राम एस लिमये, . सुरेश बी नागरे.
युवा पुरुष अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार – देवेश सी दीक्षित, एम. ए. हसीब, मयुर एम जैन, अविनाश एस खैरनार, मोहित आय लोखंडे.
महिला अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार – पूजा एस पटेल, डॉ. शैलजा ए पाटील, रुपाली एस फुले.
एकलव्य पुरस्कार [गैर अभियांत्रिकी वर्ग ] नेवीन फोली, उपाध्यक्ष (रिसर्च & डेव्हल्पमेंट), अलकॉन इलेक्ट्रॉनिक्स.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. वेदांत राठी व आभार इंजि. समीर कोठारी यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर चे अध्यक्ष सुमित खिंवसरा, मानद सचिव . समीर कोठारी, सहसचिव दिपक पंजाबी, धीरज पिचा. विलास पाटिल, महेंद्र कोठारी, मनीष कोठारी, संतोष मुथा, नरेंद्र बिरार, . विपुल मेहता, . महावीर चोपडा, महेंद्र शिरसाठ, वेदांत राठी, . मंगेश गांधी, . संजय देशपांडे, . पंकज जगताप, . गौरव धारकर , अजित पाटील, अंकिता पारख, सहश्ररश्मी पुंड, संकेत आंबेकर, श्रीकांत बच्छाव यांच्यासह आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. .