कोरोना रुग्णांची संख्या आता लक्षणीय कमी झालेली आहे. परंतु कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना आता खुबे दुखण्याचा त्रास जाणवू लागला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना मुळे रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण वाढते . खुब्याला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी मध्ये रक्ताच्या गाठी कॉवीड नंतर अधिक प्रमाणात बनू लागल्या. खुब्याचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे खुब्याचे हाड खराब होण्यास सुरुवात होते व रुग्णांना खुबे , कंबर व क्वचित गुडघा दुखण्याचा देखील त्रास व्हायला लागतो. वैद्यकशात्राला आधीपासूनच AVN हिप नावाचा आजार माहिती असून यावर अनेक रुग्णावर यशस्वी उपचार शक्य आहे अशी माहिती नामवंत ओर्थोपेडिक तज्ञ डॉ.अजिंक्य देसले यांनी दिली .
ते पुढे म्हणाले की या आजाराची लक्षणे म्हणजे खुबा आणि कंबर दुखणे, मांडी घालण्यास तसेच दोन पायावर खाली बसण्यास त्रास होणे. आजाराच्या पुढील टप्प्यात रुग्णाला चालणे देखील असह्य होते. साधारणतः कोरोना झाल्याच्या ५-६ महिन्यां नंतर हा त्रास सुरु होतो व वाढत जातो.
निदान कसे होते ?????
या आजाराच्या निदान साठी खुब्याचा एक्सरे व एम आर आय करण्याची गरज असते, यामध्ये आजाराची कुठली स्टेज आहे हे आपल्याला समजते व त्यानुसार उपचार करता येतात. ह्या आजारात जीवाचा धोका अजिबात नसतो . AVN च्या सुरवातीच्या टप्प्यामध्ये गोळ्या – औषध व काही फिजिओथेरपी दिली जाते. सुरवातीच्या टप्प्यात core decompression नावाच्या सर्जरी ने हिप रिप्लेसमेंट टाळता येऊ शकते. आजाराच्या पुढील टप्प्यात हिप रिप्लेसमेन्ट एक यशस्वी व प्रभावी उपचारपद्धती आहे वेळेत या आजारावर उपचार केल्यास आपण खुबा सांधेरोपण टाळू शकतो असेही
डॉ.अजिन्क्य देसले