संदीप फाउंडेशन हे शिक्षणक्षेत्रातील अल्पावधीतच नावारूपाला आलेले नाव आहे .स्थापनेपासूनच नवनवीन संकल्पना व नित्यनूतन अविष्कार हे ह्या शिक्षण संस्थेचे वैशिष्ट राहिले आहे .येथून निर्माण होणारे अभियंते हे औदयोगिक क्षेत्रातील भविष्यातील नायक असले पाहिजे अश्या प्रकारे त्यांना घडविले पाहिजे. . विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून आपल्या करियरची सुरुवात कॅम्पसमधुन करावी या उद्देशाने संदीप फाउंडेशन प्लेसमेंट सेल, सेंटर ऑफ एक्ससलन्स व इन्क्युबुलेशन सेंटर सुरवातीपासून कार्यरत आहे . विद्यार्थ्यांने केवळ शैक्षणीक प्रगती न करता सर्वागीण विकास व प्रगती करावी हेच अंतिम ध्येय ठेवून येथे प्रवास चालू आहे. – संस्थापक डॉ .संदीप झा
२०२० हे कोविड वर्ष म्हणुनच जगाच्या इतिहासात नोंदले जाईल . जगभरात नोकरी व व्यवसायाच्या संधी घटल्या पण या कठीण वर्षातही संदीप फाउंडेशन चे विश्वस्त मंडळ व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नाने विविध कंपन्यांना ऑनलाईन कॅम्पस घेण्याची विनंती करण्यात आली. संदीप फॉउंडेशन आणि औद्योगिक क्षेत्र यांची सुरुवातीपासून सहकार्याची भुमिका राहीली आहे .त्याच अनुषंगाने सर्व कंपन्यांनी ही विंनती मान्य केली. व चमत्काराचे एक पर्व सुरु झाले इंजिनीरिंग कॉलेज असो , फार्मसी कॉलेज असो वा एमबीए कॉलेज असो सर्वत्र ऑनलाईन कॅम्पसचा चमत्कार घडून आला.
७०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
२०२० मध्ये संदीप फॉउंडेशन च्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना इन्फोसिस , टिसिएस , विप्रो , कॉग्निझंर , इंटर्नस , कॅपजेमनी , पर्सिस्टन्ड , बायजूस , श्री एकविरा , कोणार्क , या व अशा अनेक नामांकित कंपन्यांत प्लेसमेंट मिळाली . हि संधी त्यांना संदीप फाउंडेशनतर्फे त्यांची सर्वांगीण जडणघडण झाल्याने करता येणार आहे .
प्लेसमेंट सेल हा तीन स्तरावर
संदीप फाउंडेशन मध्ये प्लेसमेंट सेल हा तीन स्तरावर कार्यरत आहे . पहिला व मुख्य स्तर हा फाउंडेशन स्तरावर कार्यरत असुन महाविद्यालयीन व विभागीय अश्या स्तरावर इतर दोन स्तर कार्य करतात या सेलतर्फे विद्यार्थ्यांना एप्टीट्यूड , ग्रुप डिस्कशन , रिझ्युम , रायटिंग , व्यक्तिमहत्व विकास व कौशल्य विकास यांचे प्रशिक्षण दिले जाते . यासाठी त्यांच्या क्षेत्रातील ख्यातनाम संस्थांना आमंत्रित केले जाते . सध्यां प्लेसमेंट सेलचे नेतृत्व प्रा . विवेक पाटील हे करत असुन त्यांना इतर सहकाऱ्यांची साथ मिळत असते .अद्यावत संगणक लॅब, सेमिनार हॉल व वेगळया कलासरूमची संगतही येथील प्लेसमेंट सेलला मिळत असते .
सेंटर ऑफ एक्ससलन्स हि संकल्पना
प्लेसमेंट सेल प्रमाणेच सेंटर ऑफ एक्ससलन्स सुद्धा अतिशय कार्यक्षमतेने कार्यरत असते . सेंटर ऑफ एक्ससलन्स हि संकल्पना इंडस्ट्री ४.० या आधुनिक संकल्पेनेला अनुसरून स्थापन करण्यात आले आहे . विद्यार्थी व प्राध्यापक हे औद्योगिक जगात घडणाऱ्या घडामोडींशी अवगत असावेत हा त्यांचा एक उद्देश आहे . यांचं अनुशंगाने विविध कंपन्यांशी जसे अक्सोल रिनूएबल प्रा लि ., स्टालवर्ट स्पेस लिमिटेड यासारख्या कंपन्यांशी सामंज्यस करार करून विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रक्षिक्षण दिले जाते . विद्यार्थी केवळ पुस्तकी किडा न राहता त्याने उत्तम अभियंता बनवण्यासाठी योग्य तो व्यवहारी व औद्योगिक प्रक्षिक्षण घेतले पाहिजे ही त्यामागील प्रमुख संकल्पना आहे . विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रोजेक्टरवर काम करायला मिळावे त्यांचे शैक्षणिक प्रोजेक्ट हे औद्योगिक क्षेत्रात मानदंड ठरावेत असा त्यामागील एक प्रमुख ध्यास आहे.