शिक्षण क्षेत्रात संस्था नावारूपाला येण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण त्या संस्थेच्या स्थापने मागे जर स्वतः उच्च विद्या विभूषित व्यक्ती असेल तसेच स्पष्ट ध्येय , शिक्षणाप्रती तळमळ व विद्यार्थ्या प्रती समर्पण हीच त्रिसूत्री असेल तर यश नक्की मिळते व तेही अल्पावधीतच .
स्थापने नंतर अवघ्या १२ वर्षात स्वतः एम .टेक व डॉक्टरेट असलेल्या डॉ . संदीप झा यांनी स्थापन केलेल्या नाशिक च्या संदीप फाऊंडेशन ने अल्पावधीत केवळ राज्य व देशातच नव्हें तर परदेशातही उत्तम विद्यार्थी घडविणारी संस्था म्हणून नाव लौकिक कमविला आहे . नाशिक सोबतच सिजोल या आपल्या मूळ गावी देखील ही शिक्षणाची गंगा नेण्यात यश आले आहे. हे कसे काय घडले ? डॉ . संदीप झा यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात
सामान्य कुटुंबात जन्म- वडील शिक्षक
आम्ही बिहारमधील मिथीला येथील सिजोल गावातील रहिवासी. माझे तिसरी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले. माझे वडील शाळेत शिक्षक असल्याने त्यांची बदली कोलकता येथे झाली. तिथेच माझे माध्यमिक आणि विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण झाले. त्यानंतर मी सहा महिने सरकारी नौकरी केली. नौकरी करण्याची कला मला जमली नाही. त्यामुळे सुरक्षित सरकारी नोकरी सोडली. माझी महत्वाकांक्षा “लेने वाला नहि दे ने वाला” बनण्याची होती. त्या मुळे मी २००३ मधे स्वप्न नगरी मुंबईत मुलुंड येथे संदीप अकादमी नावाने अभियांत्रिकीचे क्लास सुरु केले. त्यानंतर २००८ मध्ये नाशिक येथे संदीप फाउंडेशन चे पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले.
२०१५ मध्ये दुसरे अभियांत्रिकी महाविद्यालय, दोन पदविका महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, व्यवसाय व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय सुरु केले. सन २०१६ मध्ये आम्हला महाराष्ट्र सरकारने उत्तर महाराष्ट्रातील पहिले “स्व-अर्थासहित” विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली.
दरी भरून काढण्यासाठी “संदीप विद्यापीठ”
आजमितीस जागतिक गरजा आणि स्पर्धा व पारंपारिक विद्यापीठात शिकवला जाणारा अभ्यासक्रम यांच्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळते. भारतात केवळ २५ टक्के अभियंते हे रोजगारक्षम आहेत. ही दरी भरून काढण्यासाठी व रोजगारक्षम शिक्षण उपलब्ध करून देण्यासठी आम्ही “संदीप विद्यापीठ” स्थापन केले. केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सलग्न राहून हे कार्य करणे शक्य नव्हते. आम्हाला अभ्यासक्रम नियोजनाचे स्वातंत्र्य हवे होते. आमच्या विद्यापीठात “संशोधनास चालना देणारे, प्राप्त केलेल्या ज्ञानाची व्यावहरिक उपलब्धी देणारे आणि प्रयोगशील प्रात्यक्षिकांवर भर देणारे शिक्षण” संदीप विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येते. आम्ही विविध औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ कायम आमंत्रित करतो. आमचे विद्यार्थी नेहमीच उद्यमशील वातावरणात असतात हे आमचे वैशिष्ट्य आहे.
संदीप विद्यापीठ हे एक “स्व- अर्थासहित” विद्यापीठ आहे. तसेच संदीप विद्यापीठ आणि संदीप फाउंडेशन असे दोन्ही शैक्षणिक केंद आम्ही चालवितो. संदीप फाउंडेशन ची महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशि संलग्न आहे. व त्याचे अभ्यासक्रम येथे चालविले जातात. तर, संदीप विद्यापीठात आम्ही तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते. आजमितीस संदीप विद्यापीठात अभियांत्रिकी, व्यवसाय व्यवस्थापन , औषधनिर्माण शास्त्र, विधी, फ्याशन डिझायनिंग, सौंदर्य प्रसाधन आदि अभ्यासक्रम सुरु आहेत. संदीप विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाना प्रवेशासाठी “एसयु-जेईई” (संदीप युनिवर्सिटी जॉईट एन्ट्रस एक्झाम )नावाने स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात येते.
संदीप विद्यापिठाचा अभ्यासक्रम
आम्ही एक अभ्यासमंडळ स्थापन केले. त्यात विविध उद्योजक, मान्यवर विद्यापीठांचे प्राध्यापक, शिक्षण तज्ञ यांचा समावेश होता. या व अशा सर्व तज्ञांनी एकत्र येऊन हा अभ्यासक्रम ठरविला. भविष्यातील गरजा, तंत्रज्ञान आणि रोजगार उपलब्धी यावर आधारित आमचा अभ्यासक्रम आहे.
आजमितीस टोयोटा, सीड्याक, आयबीएम, भाभा अणु संशोधन केंद्राचा आकृती प्रकल्प, भारतीय अवकाश संशोधन केंद्र यांबरोबर आमचे करार झाले आहेत.
आजचा अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम व जागतिकिकरण
अभियांत्रिकी असो वा कोणतेही क्षेत्र शिक्षण हे प्रकाल्पधीष्ठित आणि प्रयोगशील असावे. देशात प्रतिवर्षी सुमारे१० लाख विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होतात. त्यांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यांना’ जर महाविद्यालयीन काळातच प्रयोगशील शिक्षण मिळाले आणि त्यातील केवळ १० टक्के अभियंत्यांनी ते प्रत्यक्षात आणले तरी बदल घडेल पण तसे होताना दिसत नाही हि मोठी शोकांतिका आहे. यासाठी विचार बदलणे आवश्यक आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रकल्प, प्रयोग, चिंतन यांवर आधारित शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत संशोधन होणार नाही. आजचे शिक्षण गुण पद्धतीवर अवलंबून असल्याने विद्यार्थी घोकंपट्टी करतात. त्यामुळे व्यवहारमूलक अभियंते घडताना दिसत नाहीत.
काही नवे कोर्सेस ?
संदीप विद्यापीठात अग्निशमन आणि सुरक्षा, रसायन अभियांत्रिकी, सूक्ष्म तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रम देखील आम्ही सुरु करणार आहोत. तसेच, इन्टरनेट सुरक्षा साठी देखील अभ्यासक्रम आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तसेच अनेक पार्ट टाईम कोर्सेस देखील येथे उपलबद्ध आहेत.
महत्वाच्या बाबी
संशोधन व प्लेसमेंट या एखाद्या शिक्षण संस्थेच्या महत्वाची अंगे आहेत. अनेक नामवंत संस्थांशी करार केल्यामुळे येथे संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत तसेच प्लेसमेंट ची उत्कृस्ट परंपरा असून सध्या च्या कोविड च्या स्थितीतही जवळपास १०० टक्के प्लेसमेंट करू शकल्या बाबत समाधानी आहे. अनेक प परदेशातील विदयार्थी देखील आज नाशिक येथील कॅम्पस मध्ये शिक्षण घेत आहेत
जागतिक दर्जाचे शिक्षण आणि सुविधा देणारे, प्रयोगशील शिक्षणाचे दूरदर्शी विद्यापीठ. विविध प्रकल्प, संशोधन, आणि नवनिर्मिती चा ध्यास या बलस्थानावर संदीप विद्यापीठ हे लवकरच “आंतरराष्ट्रीय विद्यापीठ” असेल.
डॉ . संदीप झा
Dr. Sandip Jha
One of theExcellent university of india
Feel proud to be a part of Sandip Family
Such a wonderful journey