Social Entrepreneur – Shripad Kulkarni

Advertisements

“माझ्या जडणघडणीमध्ये समाजातील अनेक नामवंत व्यक्ती, माझे गुरु तसेच माझ्या परिवारातील अनेकांचा मोलाचा वाटा असून समाजाच्या ऋणांची थोडीफार परतफेड करता यावी यासाठीच आज कार्यरत आहे .

“-श्रीपाद कुलकर्णी (उद्योजक व संस्थापक अध्यक्ष – ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल)

“इवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी “

श्रीपाद कुलकर्णी यांनी 2012 मध्ये ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल अर्थात बी बी एन जी च्या रूपात लावलेल्या रोपट्याचे ही असेच काही आहे.


सामाजिक उद्योजकता अर्थात  Social Entrepreneur   या भावनेने  कार्य करणाऱ्या श्रीपाद कुलकर्णी यांचा सोलापूर ते नाशिक हा प्रवास एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथेला साजेसा असाच आहे. गरीब कुटुंबात जन्म ,लहानपण व शिक्षण हालाखीत पण सभोवतालच्या परिस्थितीमुळे इंजिनीयर होणे हेच यशाचे परिमाण असे मनावर बिंबलेले. व त्यातच स्वतःच्या मातेला मी इंजिनियर होईल असा दिलेला शब्द यामुळेच त्या लक्ष्याकडे प्रवास सुरू केला.बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यात असंख्य अडचणी आल्या शिक्षण मध्येच सोडून नोकरी पत्करावी लागली अगदी ती किराणा दुकानात पुड्या बांधण्याची. हे सर्व करत असताना तांत्रिक बाबित असलेली आवड काही स्वस्थ बसू देईना. याकरिता सोलापुरातील एका कंपनीत अगदी ऑफिस बॉय ची नोकरी पत्करली .पण तेथील साहेबांनी श्रीपाद कुलकर्णी यांच्यामधील चमक ओळखली व प्रोत्साहन दिले. त्या कंपनीत शिकायला तर भरपूर मिळाले व अनेक कठीण प्रसंगी दिलेल्या तांत्रिक सल्ल्यामुळे बक्षीसही हे बक्षीस म्हणजे पुढे शिक्षण घेण्याची संधी.


काही दिवसांनी  नाशिकला आलेली नोकरीची संधी स्वीकारल्यानंतर अनेक कवाडे खुली झाली .काही वर्षे नोकरी केल्यानंतर सुद्धा मन काही स्वस्थ नव्हते .स्वतःचे काहीतरी सुरू करावे असे मन वारंवार सांगत होते .मग 1990 चाली फक्त तीनशे पन्नास चौरस मीटर जागेत स्वतःचा उद्योग सुरू केला . तांत्रिक ज्ञान, जिद्द व सचोटी या बळावर चांगलाच पाय रोवला .मध्ये काही काळात अनंत अडचणी आल्या .कारखान्याला आग देखील लागली. पण या सर्व संकटातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेतली. उद्योजकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या श्रीपाद कुलकर्णी हे अनेक संस्थांमधून देखील सक्रिय आहेत या संस्थांमध्ये नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन म्हणजे निमा ,लघु उद्योग भारती ,सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग फेडरेशन या काही प्रमुख आहेत.


आपली कंपनी श्रीसन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड च्या यशानंतर देखील ज्या समाजाने आपल्याला घडवले त्या समाजासाठी काहीतरी करावे अशी तळमळ होती. पिढ्यानपिढ्या चाकरमाने अशी ओळख असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या उद्योजक यांच्या करिता  एक नेटवर्किंग संस्था उभारावी जेणेकरून समाजात उद्योजकता वाढीस लागेल या कल्पनेतून 2012 ला काही समविचारी मित्रांना एकत्र आणले. विचारमंथन होऊन 2014 ला ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल अर्थात बी बी एन जी ची मुहूर्तमेढ रोवली.आणि अवघ्या काहीच वर्षात श्रीपाद कुलकर्णी यांचे विचार समाजातील व्यवसायिकांना रुजू लागले पटू लागले.हम तो चले थे अकेले लेकिन कारवां बनता गया….
या उक्तीप्रमाणे आजमितीला महाराष्ट्र तसेच देशातील अनेक शहरात बी बी एन जी चे जाळे विस्तारले आहे. त्या त्या शहरात आठवड्यातून एकदा व्यवसायिक भेटतात आपापसात विचारांची देवाण-घेवाण करतात एक दुसऱ्याला रेफरन्स देतात व श्रीपाद कुलकर्णी यांनी बघितलेल्या संपन्न ब्राह्मण ,समृद्ध ब्राह्मण व समर्थ ब्राह्मण या स्वप्ना कडे वाटचाल करतात.


अभिजीत चांदे

माध्यम व जनसंपर्क सल्लागार

९८२२७५३२२६

6 thoughts on “Social Entrepreneur – Shripad Kulkarni

Leave a Reply

You cannot copy content of this page