बाळाने पोटात शी केलीय ???

Advertisements

बाळाने पोटात शी करणे हे त्याच्या जीवाला धोका निर्माण करणारे ठरू शकते ,कारण ही विष्ठा जर बाळाच्या फुफुस्सात गेली तर त्याची प्रकृती गंभीर होऊ शकते 

डॉ संजय आहेर, नवजात शिशु अतिदक्षता तज्ञ, निओकेअर हॉस्पिटल, नाशिक

प्रसूती दरम्यान बरेचदा नवजात बाळाची विष्ठा (Meconium) हि बाळाच्या फुफुस्सात गेल्याने प्रकृती गंभीर होते. Meconium ही नवजात बाळांची सर्वात पहिली विष्ठा असते . तिचा रंग हिरवट काळा असतो व बाळ गर्भात असताना जे घटक बाळ गिळते त्यातून ही विष्ठा बनते . Meconium  हे साधारण पणे बाळाच्या आतड्यात साठून राहते  परंतु प्राणवायूचा अभाव झाल्यास ही विष्ठा बाळाच्या आतड्यातून बाहेर येऊन गर्भजलामध्ये मिसळून जाते . बाळ आईच्या पोटातून बाहेर येत असताना ही विष्ठा बाळाच्या नाकातोंडातून बाळाच्या पोटात व फुफुस्सात प्रवेश करते. त्यामुळे बाळाला श्वास घेण्यास अडथला निर्माण होतो. या विष्ठे मुळे त्याला न्युमोनिया तसेच जन्तुसंसर्ग होऊ शकतो .

मेकोनिअम लक्षणे –

१.    सर्वप्रथम गर्भजलाचा रंग हिरवा किंवा काळा दिसतो.

२.    जर बाळाने खूप अगोदर आईच्या गर्भात विष्ठा केली असेल तर बाळाची त्वचा, नखे व नाळ हिरव्या रंगाच्या दिसतात.

३.    जन्मानंतर बाळास श्वास घेण्यास त्रास होणे, बाळ निळे पडणे, लगेच न रडणे, बाळाची छाती खूप प्रमाणात फुगल्यासारखी दिसणे इ. लक्षणे दिसू लागतात.

४.    बाळाच्या छातीचा एक्स-रे केला असता त्यात देखील जास्त प्रमाणात विष्ठा जमा झालेली दिसून येते.

५.    बाळाच्या तपासणीत व रक्ताच्या तपासणीत प्राणवायूचे प्रमाण खूप कमी झालेले दिसते. बाळाचे हात, पाय व ओठ निळसर होतात.    

अशा प्रसंगी बाळास तातडीने नवजात शिशु अतिदक्षता विभागात नेऊन त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो .काहीना कृत्रिम श्वासाचे मशीन [व्हेंटिलेटर ] वर ठेवावे लागते .त्यास श्वास घेता यावे याकरिता  सरफॅक्टन्ट  नावाच्या इंजेक्शन चा वापर करण्यात येतो. हे इंजेक्शन बाळाच्या फुफुसात सोडण्यात येते .पण याहूनही काही गंभीर बाळासाठी त्यांना एका हाय फ्रीक्वेन्सी व्हेंटिलेटर  वर ठेवावे लागते .

या व्हेंटिलेटर मशीनची खासियत म्हणजे जिथे सर्वसाधारण व्हेंटिलेटर मशिन मिनिटाला ६० वेळा श्वास देऊ शकते जिथे हि हाय फ्रिक्वेंसी मशीन मिनिटाला ६०० – ७०० वेळा श्वासोच्छवास देऊ शकते. काही केसेसमध्ये बाळाची प्रकृती इतकी गंभीर होऊन जाते की ते बाळ हाय फ्रिक्वेंसी व्हेंटिलेटरवर देखील स्वत:च ऑक्सिजनचे प्रमाण नॉर्मल लेव्हलला आणू शकत नाही.

अशा बाळांसाठी एक खास प्रकारचा गॅस ज्याचे नाव आहे नायट्रिक ऑक्साईड तो दिला जातो. जो फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब रक्तदाब कमी करून श्वासोच्छवास सुखकर करण्यात मदत करतो. साधारणत: १००० पैकी १० नावजातांना   नायट्रिक ऑक्साईड द्वारा उपचाराची गरज भासते. हा गॅस व हाय फ्रिक्वेंसी व्हेंटिलेटर वेळेत उपलब्ध न झाल्याने नवजात दगावू शकतात.  दहा वर्षात नवजात शिशूंना लागणा-या वैद्यकीय सेवेत नाशिकने वाखाणण्याजोगी प्रगती केली असून या दोन्ही मशीन्सची सुविधा आज नाशिकमध्ये उपलब्ध आहे.

–    डॉ संजय आहेर {D.M. Neonatology, M.D. Pediatrics F.N.P.M. (Canada), F. I.N.( Australia & UK)}

One thought on “बाळाने पोटात शी केलीय ???

Leave a Reply

You cannot copy content of this page