नाशिक: काही वर्षांपूर्वी जन्मत: 555 ग्रॅम वजन असणाऱ्या अत्यवस्थ बालिकेस जीवदान देऊन उत्तर महाराष्ट्रात विक्रम नोंदवणाऱ्या डॉ.संजय आहेर यांच्या निओकेअर हॉस्पिटलने अजून एक विक्रम नोंदवला आहे. जन्मत: केवळ 490 ग्राम वजन असलेल्या एका अत्यवस्थ शिशू ला जीवन दान देण्यात नुकतेच निओकेअर हॉस्पिटल ला यश मिळाले आहे. जन्मत: एवढ्या कमी वजनाच्या बाळास वाचविण्याची उत्तर महाराष्ट्र मधील पहिलीच घटना आहे.
या बाबत अधिक माहिती अशी मार्च 2024 महिन्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भधारणे नंतर अवघ्या 6 व्या महिन्यात नाशिकच्याच डॉ.यशवंत माने यांच्या अथर्व इन्फर्टिलीटी सेंटर येथे जन्म झालेल्या जुळ्याचे [एक मुलगा आणि एक मुलगी] जन्मत: अत्यंत कमी वजन म्हणजे अनुक्रमे 490 ग्रॅम आणि 630 ग्रॅम असल्याने त्यांना निओकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. 3 महिन्यांच्या उपचारानंतर नुकतेच या बाळांना डिस्चार्ज मिळाला . डिस्चार्जच्या वेळेस मुलाचे वजन 1790 ग्रॅम आणि मुलीचे वजन 1955 ग्रॅम होते.
नाशिक जिल्ह्यातील चांदोरी या लहान गावात जन्म व शालेय शिक्षण झालेल्या डॉ. संजय आहेर यांनी शालेय शिक्षणानंतर पुण्यातील प्रतिष्ठित बी जे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एमडी ही पदवी घेतली तसेच मुंबईतील केईएम हॉस्पिटलमधून नवजात शिशु चिकित्सा मध्ये डीएम ही पदवी मिळवली . विविध देश जसे ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि यू.के. मधील पाच वर्षांच्या अनुभवामुळे त्यांचे कौशल्य आणखी समृद्ध झाले. विदेशात असंख्य संधी आणि आर्थिक दृष्ट्या देखील परदेशात रहाणे फायद्याचे परंतु तेथील संधी आणि पैश्या पेक्षा आपल्या देशात सेवा देण्यास प्राधान्य दिले आणि 2007 पासून जन्मभूमी नाशिक मध्ये ही सुरवात झाली. प्रतिसाद मिळत होता ..पण गरज होती ती एका हॉस्पिटल ची आणि 2010 मध्ये अद्ययावत निओकेअर हॉस्पिटलची स्थापना केली.
गेल्या 14 वर्षात डॉ. आहेर यांनी हजारो गंभीर नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले असून आजमितीला. नाशिक, उत्तर महाराष्ट्र , विदर्भ , ठाणे एवढेच नाही तर अगदी मध्य प्रदेश आणि गुजरात येथून देखील बालके निओकेअर मध्ये उपचारांसाठी आणले जातात.
आज सर्व अद्ययावत उपलब्ध सुविधा निओकेअर मध्ये उपलब्ध असून यामध्ये बाळाने पोटात शी केल्यास जीवनरक्षक नायट्रिक ऑक्साईड डिलिव्हरी सिस्टीम व हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटीलेटर .,एक किलोपेक्षाही कमी वजनाच्या बाळांसाठी अद्ययावत काचेची पेटी (जिराफ ओम्नी बेड),संसर्गाची व फुफ्फुसांना इजा होण्याची शक्यता कमी असणारे विना नळीचे व्हेंटीलेटर ( NIV ),उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अत्याधिक 25 बेडचा लेव्हल III दर्जाचा अतिदक्षता विभाग (NICU),खास नवजात बाळांसाठी निर्मित 24 तास सेवा देणारी व्हेंटीलेटर सुविधेसह रुग्णवाहिका, वर्ल्ड क्लास मेक्वेट सर्वो आय आणि SLE व्हेंटिलेटर., बेड शेजारी 2 डी इको, कलर डोप्प्लर आणि अल्ट्रासाऊंड सुविधा, ऑक्सिजन ब्लेंडरसह फिशर आणि पेकेल सीपीएपी- अत्यंत अकाली अर्भकांना अचूक ऑक्सिजन प्रदान करण्यासाठी.,परिपूर्ण पॅरेंटरल न्यूट्रिशन (TPN) सुविधा,24 तास पॅथॉलॉजी, एक्स-रे आणि जनरेटर बॅकअप. व 24 तास प्रशिक्षित बालरोगतज्ञ आणि NICU परिचारिका या प्रमुख आहेत.
या पत्रकार परिषदेस नेत्ररोगतज्ञ डॉ.स्वाती आहेर उपस्थित होत्या.
