ब्राह्मण समाजाची देशातील सर्वात मोठी सामाजिक संस्था ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल [ बी बी एन जी ] तर्फे ९वी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद “परिवर्तन” २ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी एम जी एम संस्थेच्या रुख्मिणी सभागृह छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. व्यवसाय, ज्ञान वृद्धी आणि नेटवर्किंग साठी ही परिषद ओळखली जाते. या परिषदेच्या निमित्ताने देश विदेशातील अनेक नामवंत वक्ते व शेकडो व्यवसायिक छ. संभाजी नगर ला येत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली .
समर्थ ब्राह्मण! समृध्द ब्राह्मण !! संपन्न ब्राह्मण !!! …या ब्रीदवाक्यनुसार चालणाऱ्या बीबीएनजी च्या या वर्षीच्या परिषदे दरम्यान उद्यम कौस्तुभ आणि जीवन गौरव या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे . या मध्ये छत्रपती संभाजी नगर येथील लाइफलाईन मेडिकल डीव्हायसेस प्रा लि.चे डॉ.विक्रांत भाले यांना उद्यम कौस्तुभ तर ग्राइंड मास्टर प्रा लि चे मिलिंद व मोहिनी केळकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या शिवाय अन्य पुरस्कार्थी पुढील प्रमाणे – डी एस ए इलेक्ट्रोकंट्रोल्स प्रा लि मुंबईच्या आरती सुभेदार,ढेपे वाडा पुण्याचे नितीन ढेपे, सिम्प्लेक्स टेक्स्टाईल मिल्स भिवंडीचे अरविंद पहुरकर ,रेनमाक इंडिया प्रा लि मुंबई चे निलेश दीक्षित, युएइ येथील आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉ.संजय पैठणकर ,टायमस कंपनी नाशिकचे सुमित तिवारी, शुभम सेल्स –सोलर, पुण्याच्या ज्योत्स्ना गोडबोले यांना उद्यम कौस्तुभ तर अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती संस्था मुंबईचे प्रभाकर कुलकर्णी हे जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत .
परिषदेचे उद्घाटक म्हणून बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेड च्या सह-संस्थापक व कार्यकारी निर्देशक सुप्रिया बडवे व किशोर पंप्स चे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहील .विख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे हे देखील या परिषदेसाठी आवर्जून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते ब्राह्मण समाजातील यशस्वी उद्योजकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबत डॉ. विजय जोशी (सिडनी, ऑस्ट्रेलिया), आनंद गानु (गर्जे मराठी यूएसए), अशोक बिल्डकॉन चे सी इ ओ संजय लोंढे , रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर चे विवेक देशपांडे , एस एम ऑटो स्टॅम्पिंग चे संचालक मुकुंद कुलकर्णी , मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चे महासंचालक मुनीश शर्मा ,सीसीई फिनलंड येथील धोरण आणि विकास विभागाचे संचालक हेरंब कुलकर्णी,मुंबई एजुकेशन ट्रस्ट- भुजबळ नॉलेज सिटी नाशिकच्या शेफाली निधोजकर – भुजबळ ,अॅनालायझर चे सुशील कुलकर्णी,एम एस एम ई बोर्ड सदस्य प्रदिप पेशकार ,अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी ,परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅ. आशिष दामले,एनएचपीसी चे संचालक डॉ.उदय निरगुडकर ,बूम ९१ चे संस्थापक ओंकार दाभाडकर ,क्लिक स्किल्स एज्यु.प्रा लि चे प्रथमेश सखदेव ,सीटेशन बिल्डर प्रो प्रा लि चे श्रीपाद देशमुख , अरविंद कोरालकर, सुयोग नरवणे , महेश देशपांडे , डॉ .अजय शेष असे नामवंत उद्योजक उपस्थित राहणार आहेत.
परिषदेला अधिकाधिक ब्राह्मण उद्योजकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बी बी एन जी चे सहयोगी संचालक डॉ.अभिजित चांदे, परिषदेचे कप्तान शैलेश देशपांडे , उपकप्तान गीता आचार्य आणि संयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे .अधिक माहितीसाठी http://www.bbngparivartan.com
