मोबाइल, आयपॅड, लॅपटॉप, कम्प्युटर व टीव्ही अशा विविध उपकरणांच्या ‘स्क्रीन’चा दिवस-रात्र डोळ्यांवर मारा होत असून, त्यामुळे डोळ्यांच्या कोरडेपणाची (ड्राय आय) समस्या ४० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.
ही समस्या १५ ते ४० या वयोगटात सर्वाधिक दिसून येत आहे. डोळ्यांच्या कोरडेपणाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. पालकांनी स्वतः सह आपल्या मुलांचाही ‘स्क्रीन टाइम’ कसा कमीत कमी राहील, याला प्राधान्य दिले पाहिजे.- डॉ. अंगना साहू नेत्र रोग तज्ञ- (सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल)
कम्प्युटर, मोबाइलच्या व टेलिव्हिजनच्या अतिवापरामुळे ‘ड्राय आय’ ही समस्या असून डोळ्यांतील पाणी, लिपिड व म्युकस या तीन घटकांच्या असमतोलामुळेच कोरडेपणाची समस्या उद्भवते. यामध्ये डोळ्यातील अश्रुंचे प्रमाण कमी होणे किंवा अश्रुंची निर्मिती मंदावणे किंवा अपेक्षेप्रमाणे अश्रुंचा दर्जा-गुणवत्ता नसणे किंवा अनुग्रंथी ब्लॉक होणे अशा प्रकारच्या विविध समस्या दिसून येतात आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून डोळे कोरडे होत आहेत .
स्क्रीनच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या कोरडेपणाच्या समस्येला ‘कम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम’ (सीव्हीसी म्हटले जाते. स्क्रीनचा अधिकाधिक वापर करणाऱ्या मध्ये ही समस्या जास्त दिसते. रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉज) दिसून येते.
औषधोपचार, कमीत कमी टाइम’ व योग्य काळजीबरोबरच ‘अ’ जीवनसत्वाची (गाजर, पपई, मुळा, चीज, मासे आदींमधून ‘अ’ जीवनसत्व मिळते) जोड मिळाली तर या कोरडेपणाच्या समस्येवर मात करता येणे शक्य आहे.
‘स्क्रीन टाइम’ हा खूप जास्त असेल तर पापणी लवण्याचे प्रमाण (ब्लिंकिंग) नक्कीच घटते आणि अश्रुंचे बाष्पीभवन होते. तिथून डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या सुरू होते. त्यातच स्क्रीन जितका जास्त छोटा तितका त्याचा त्रास मोठा, हे समीकरण लक्षात घेतले पाहिजे. त्याशिवाय प्रदूषण, घूळ, वाढते वय, डोळ्यांचे इतर आजार आदींमुळेही ‘ड्राय आय’ची समस्या निर्माण होते.
या कोरडेपणाच्या समस्येला इतरही विविध कारणे असली तरी आजघडीला वाढलेल्या अनेक उपकरणांच्या ‘स्क्रीन टाइम’ मुळे ही समस्या प्रामुख्याने वाढत आहे व वाढलेला ‘स्क्रीन टाइम’ हेच या समस्येचे मुख्य कारण होऊन बसले आहे. मुळात डोळ्यांवर विविध उपकरणांच्या स्क्रीनचा खूप जास्त मारा होत असेल तर गॉगल वापरणे, ‘अ’ जीवनसत्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. मुले- युवकांनी मैदानी खेळांना प्राधान्य देणे गरजेचे.
अशी घ्या काळजी
१.मोबाइल किंवा छोट्या उपकरणांचा ‘स्क्रीन
टाइम’ हा ३० मिनिटांपेक्षा जास्त नको.
२.कम्प्युटरवर काम करताना प्रत्येक २०-३०
मिनिटांनी ब्रेक घेणे ,पाय मोकळे करणे उपयुक्त ठरते.
३.कमीत कमी ‘स्क्रीन टाइम’ बरोबरच
दुचाकीवर हेल्मेट वापरणे
४. डोळ्यांच्या समस्या जाणवल्यास त्वरित तज्ञांना दाखवणे ..
