नाशिककरांना व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यसाठी, नाशिक मध्ये मोठे उद्योग, आय. टी. व नविन व्यवसाय आले पाहिजे, या उद्देशाने एकत्र आलेल्या नाशिकमधील विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत अग्रणी तसेच नाशिक मध्ये काम कारणया २७ व्यावसायिक संघटनाचे सक्रीय व्यवसायिकयांची अराजकीय चळवळ “मी नाशिककर” तीन वर्षे पूर्ण करत आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये पियुष सोमाणी, संजय कोठेकर, मनिष रावल, उमेश वानखेडे व किरण चव्हाण या नाशिकच्या विविध उद्योगात कार्यरत असणाया नामवंतांनी या चळवळीस सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमास नाशिक मधील सर्वच उद्योग संघटनांनी मोलाची साथ दिली.
या सर्व संस्थांमध्ये सी.आय.आय., महाराष्ट्र चेबर्स, क्रेडाई, निमा, आयमा, आय.एम.ए., एन.सी.एफ., इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्कीटेक, आय.जी.बी.सी., ए.आय.डब्लू.पी.ए., नाडा, फाडा, सी.एस.आय, कॅन, तान, लघु उद्योग इ. संस्थांचा समावेश आहे.
या सर्वांच्या सहकार्याने तसेच विशेष मार्गदर्शक सुधीर मुतालिक, संतोष मंडलेच्या, विलास शिंदे, श्रीरंग सारडा, अनंत राजेगावकर व प्रदीप पेशकार यांच्या मार्गदर्शनाने नाशिक मधील सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नकेले जातात. “मी नाशिककर” तर्फे प्रामुख्याने उद्योग, आय. टी., इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टीव्हिटी, पर्यटन, अॅग्रो प्रोसेसिंग, व्यवसाय व शिक्षण या क्षेत्रावर विशेष करून भर दिला जातो.
कोविड नंतर “मी नाशिककर” तर्फे “नाशिक २.०” यावर विशेष करून भर दिला जाणार असून यामध्ये पुढील बाबींवर भर दिला जाणार आहे.
- आय टी डेस्टिनेशन : नाशिकमध्ये मोठ्या आय टी कंपन्या येण्यासाठी प्रयत्न
- नवीन मोठ्या औद्योगिक गुंतवणूकीसाठी विविध स्तरावर संपर्क व पाठपुरावा. जेणे करून मोठे उद्योग नाशिक मध्ये यावे.
- कामगार संघटना व उद्योजक यांच्याशी समन्वय साधून तंटामुक्त औद्योगिक क्षेत्रासाठी प्रयत्न करणे.
- विविध स्तरांवर पाठपुरावा करून विमान, रेल्वे व रस्त्यांद्वारे नाशिकची विविध प्रमुख शहरांची कनेक्टिव्हिटी वाढविणे.
- नाशिकची विमानसेवा अधिक प्रभावी व सुरळीत होण्यासाठी नाशिकच्या एच.ए.एल येथे विमानांसाठी दुरुस्ती सेवांचे निर्माण तसेच विमान पार्किंग करण्यासाठी नाशिकच्या पर्यायाचा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा.
- नाशिकला इको-टूरिझम व वेलनेस ची चालना देणे.
- ड्राय पोर्ट, लॉजिस्टिक हब आणि एअर कार्गो साठी पाठपुरावा.
- वाईन व कृषी प्रक्रिया उदयोगास चालना मिळण्यासाठी नाशिक मध्ये तयार झालेल्या मालावर “नाशिक व्हॅली” असे ब्रान्डीग निर्यातीसाठी वापरणे.
- हेल्थ टुरिझम डेस्टिनेशन.
- फिल्म सिटी-बॉलिवुड एक्स्टेंशन.
- उच्च तंत्र ज्ञान शैक्षणिक हब
या सर्वांच्या पाठपुराव्यासाठी येत्या काही काळात “विजन नाशिक २.०” या उद्देशाने विविध स्तरावरील उपक्रमांचे आयोजन “मी नाशिककर” तर्फे करण्यात येणार आहेत. ते असे:
- सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत “मी नाशिककर” तसेच सर्व संघटनांच्या बैठकीचे आयोजन.
- २६ देशाच्या भारतातील राजदूतांची नाशिक येथे बैठक व त्यांच्यासमोर नाशिकचे सादरीकरण.
- नाशिक फिल्मसिटी साठी मुंबई येथे बैठकीचे आयोजन.
नाशिक मधील आय.टी. पार्क साठी नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्याने नाशिक मध्ये आय.टी. उद्योगातील नामवंत कंपन्या नाशिक मध्ये याव्यात या साठी नॅस्कॉम आणि आघाडीच्या कंपन्यांसोबत नाशिक मध्ये बैठकीचे आयोजन “मी नाशिककर” या चळवळीसाठी सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभत असून गेल्या तीन वर्षांपासून संजय कोठेकर (सी.इ.ओ., ऍक्सेस ग्रुप) हे ‘समन्वयक’ म्हणून तर उद्योजक मनिष रावल हे ‘डेवलपमेन्ट सेल कार्यकारी’ म्हणून काम बघत आहेत. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आगामी काळात नाशिक चा चेहरा-मोहरा निश्चितच बदलेल.
Visit for more details on http://www.nashik-2.org