घरातील ही वस्तू हरवू शकते संक्रमणाला!!

Advertisements

फ्लू, मलेरिया, इन्फ्लुएंझा, टायफाईड, टीबी इत्यादी नंतर बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला, आणि आताचे लेटेस्ट संक्रमण. यासारख्या हजारो प्रकारच्या संक्रमित होणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी “लवंग” हा रामबाण पर्याय आहे.

संक्रमित होणारे रोग प्रथम रोग्याच्या सेन्सर्स म्हणजे स्पर्श आणि ज्ञानेंद्रियांना ताब्यात घेतात. त्यातील महत्त्वाचे नाक, कान, घसा, डोळे आणि मेंदू हे मनुष्याला वस्तूंचे आणि परिस्थितीचे ज्ञान करून देणारे अवयवच वरील रोगांचे रोगजंतू प्रथम ताब्यात घेतात. त्यावर हल्ला चढवतात आणि नंतर रक्तात संक्रमित होऊन हृदय व इतर चेतासंस्थाना अनियमित करतात. त्यामुळे संपूर्ण शरीर बाधित होऊन चांगला माणूस रोगग्रस्त होऊन आडवा होतो.

 या सगळ्या प्रोसेस मध्ये सामान्य माणसाला एक अशी गोष्ट हवी असते की जी जिभेवर ठेवून केवळ तोंडात धरली असता रोगजंतूना कान, नाक, घसा, डोळे आणि मेंदू या अवयवांवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही, ती जादुई औषधी आहे “लवंग”

लवंग ही मुळातच औषधीयुक्त एंटीऑक्सीडेंट गुणधर्माची आहे. लवंग एक नॅचरल अँटिबायोटिक देखील आहे. बाहेरून शरीरात फिरणाऱ्या जिवाणू तसेच विषाणूंचा नाश लवंग अगदी विनासायास करते. लवंग केवळ तोंडात असेल तरीही पित्त, कफ आणि वात हे तिन्ही प्रकोप थंड पडतात. त्यामुळे फुफ्फुसा द्वारे घशात येणारा बलगम म्हणजे कफ आतल्या आतच पातळ होऊन विष्टे द्वारे वाहून जातो.

अशाच प्रकारे पोटात उत्पन्न होणारे पित्त आणि त्याच्या प्रकोपाने निर्माण होणारा वायू म्हणजे गॅस हा देखील शरीरातील विषाणूंच्या प्रकोपाने निर्माण होणारा रोग आहे.

शरीराला न झेपणारे मैदा व कणीक यासारखे पचायला जड तसेच मांसाहारी, अल्कोहोलिक या प्रकारचे अन्न आतल्याआत लिव्हर आणि आतड्यांमध्ये सडते त्यावर ऍसिडिक प्रक्रिया होतात आणि पित्त प्रकोप होतो तसेच त्यापासून उत्पन्न होणारा दुर्गंधीयुक्त गॅस जास्त प्रमाणात झाल्यास जुलाब आणि वांत्या होतात.

लवंग खाल्ल्याने किंवा तोंडात धरल्याने पित्तप्रकोप तसेच गॅस आतल्याआत शमतात आणि योग्य टायमिंग साधत मनुष्याला विष्टा त्याग करण्याची इच्छा होते त्याद्वारे शरीरातील विषयुक्त टॉक्सिंन्स आणि सडलेले अन्न टॉयलेट द्वारे विनासायास बाहेर पडते. त्यामुळे रोगग्रस्त आणि संक्रमित रोगांना आमंत्रण देणारे विषाणू आतल्याआत मरतात आणि सामान्य माणूस रोगापासून बचाव करू शकतो. तर केवळ लवंग तोंडात धरल्याने सर्वात प्रथम

  • घसा मोकळा राहतो,
  • श्वास मोकळा राहतो.
  • नाकातून पाणी वाहत नाही,
  • डोळ्यांतून पाणी वाहत नाही, 
  • कान ठणकत नाहीत,
  • त्यामुळे मेंदू व्यवस्थित कार्यक्षम राहतो आणि  कार्यक्षम मेंदूमुळे हृदय आणि इतर अवयवांची चेतना शक्ती व्यवस्थित कार्यान्वीत राहते व शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

लवंग तीव्र म्हणजे तिखट गुणधर्माची असल्याने जर तोंडात धरणे शक्य नसेल तर लवंगा भाजून मिक्सर मधून त्याचे भुकटे तयार करून घ्यावे त्यात मध मिसळून पेस्ट तयार करून ठेवावी आणि दर एक किंवा दोन तासांनी जशी आवश्यकता असेल तशी अर्धा किंवा एक चमचा खात जावी. खातांना जिभेवर चघळून घशाला लागेल अशा पद्धतीने हळूहळू खावी.

दर एक किंवा दोन तासांनी शरीराला अशा प्रकारचा बूस्टर डोस दिल्यास त्या शरीरात कोणतेही विषाणू फार काळ तग धरू शकत नाहीत.

लवंग, मध, सितोपलादि चूर्ण आणि त्रिफला चूर्ण म्हणजे सोने पे सुहागा.

या कॉम्बिनेशन मुळे शरीरातील सर्व प्रकारचे विषाणू नष्ट होऊन अनियमित रक्तदाब, चरबीचे विकार, श्वसनाचे विकार, दृष्टीचे विकार, हृदयाचे विकार, पोट-आतड्यांचे विकार, किडनी चे विकार

मूत्राशयाचे विकार, स्पायनल कॉर्ड चे आजार, नसांचे विकार, सांध्यांचे विकार, हाडांचे विकार म्हणजे जवळजवळ संपूर्ण शरीराच्या व्याधी नष्ट होतात!

लवंगे मुळे शरीरातील हाडे मजबूत होऊन त्यातील मिनरल योग्य तसेच निरोगी राहते. त्यामुळे शरीराची बांधणी म्हणजे मेटाबोलिजम मजबूत होऊन बांधा सुदृढ दिसतो.

सात्विक शाकाहाराने – आहाराच्या संबंधी सर्व व्याधी नष्ट होतात. शुद्ध आचरणामुळे – अनाचारामुळे रोग टाळले जाऊन शरीरातील इम्युन सिस्टीम चांगली राहून रोगप्रतिकारक शक्ती भरपूर वाढते.

आयुर्वेदिक नॅचरल एंटीऑक्सीडेंट अशा लवंगेसारख्या औषधी नित्य सेवनात ठेवल्यास संक्रमित रोग तसेच पित्त कफ आणि वात यापासून उत्पन्न होणारे रोग विनासायास टळतील.

“लवंग” हा पदार्थ निसर्गाने रोग, व्याधी, राक्षस आणि पिशाच्च यांच्या नाशासाठी निर्माण केला होता. हळद” “तुळस” “बेल”  “दूर्वा” “औदुंबर” “रुई”, अशा वेगवेगळ्या वनस्पती लाभदायी आहेत.

जी व्यक्ती बाराही महिने एक किंवा दोन लवंग रोज तोंडात ठेवत असेल, तर त्या व्यक्तीला कोणतीही शारीरिक व्याधी होत नाही, छोटे छोटे सर्दी पडशासारखे आजारही होत नाहीत.

डॉ प्रवीण केंगे

अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल

राणे नगर-9270433863 गंगापूर रोड -9130973950 नाशिक रोड -9075033863 निफाड 7057405962

Leave a Reply

You cannot copy content of this page