अभियांत्रिकीमध्ये करिअर घडविण्याचा विचार करताय ? थांबा थोडा विचार करा आणि मग शाखा आणि महाविद्यालये विचार करून निवडा .
अभियांत्रिकी, अर्थात इंजिनीअरिंग शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे आणि हो ते असणासारच. अभियांत्रिकी हे करिअरसाठी नेहमीच सर्वात प्रमुख क्षेत्र मानले जाते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत, काही कारणांमुळे अभियांत्रिकी पदवीधरांना मुख्यत्वे समस्या भेडसावत आहेत. प्रमुख कारणांचे विश्लेषण केल्यावर आम्हाला असे कळाले की पदवीधरांनी शैक्षणिक माध्यमातून साध्य केलेले कौशल्य आणि उद्योगांच्या गरजा ह्यामध्ये खूपच अंतर आहे .अभियांत्रिकी पदवीधरांकडून काही विलक्षण कौशल्य, उद्योगाभिमुख दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची उद्योजकांना अपेक्षा आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेलल्या विद्यार्थ्यांमध्ये रोजगार करण्यायोग्य कौशल्य दिसून येत नाही येत.
राज्यनिहाय नोकऱ्यांच्या उपलब्धतेच्या आकडेवारीचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्यांची मागणी व रोजगार उपलब्ध आहेत ,त्यानंतर दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडू. उद्योग नवीन पदवीधरांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची संसाधने खर्च करत आहे कारण त्यांना आवश्यक ते ज्ञान द्यायचे आहे, ह्याचा थेट अर्थ असा आहे की ते अशा व्यक्ती शोधत आहेत ज्यांच्याकडे आवश्यक कौशल्य आहेत . सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि विक्री व्यावसायिक हे भारतातील सर्वाधिक मागणी असलेले व्यावसायिक क्षेत्र आहेत. ह्याव्यतिरिक्त इतर डोमेन जसे इंटरफेस डिझाइन आणि IoT,आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, बिग डेटा, डेटा ऍनालीटीकस ,सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल मार्केटिंग,मशीन लर्निंग ह्या क्षेत्रात देखील अधिक मागणी आहे. पण अशा वेळी स्वाभाविकच मनात प्रश्न उभे राहतात, की खरंच इतक्या अभियंत्यांची आवश्यकता आहे का? अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य असणे गरचेचे असते ? इंजिनीअरिंग म्हणजे काय? किती विद्याशाखांतून हे शिक्षण घेता येतं?
अभियांत्रिकी विषयी मनातील सर्व प्रश्नांना उत्तर देणारा हा खास लेख…
इंजिनीअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या रोजगार संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. माझे स्पष्ट मत आहे की विद्यार्थ्याने आपल्या विषयातल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची निवड करावी. प्रमुख क्षेत्रात रोजगारांच्या संधी हव्या असल्यास मूळ शाखांची निवड योग्य ठरतं. (उदा. संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान,सिव्हिल अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, केमिकल अभियांत्रिकी), आणि स्पेशलाइज्ड शाखांची निवड पदवीच्या वेळेस केल्यास आपल्या रोजगाराच्या संधी त्या शाखेपुरत्याच मर्यादित राहतात. उदा. ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग शाखेची निवड केल्यास केवळ वाहन उद्योगापुरतच्या नोकरीच्या संधी मर्यादित राहतात. त्याऐवजी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची निवड केल्यास पुढे एरोस्पेस, मरिन, ऑटोमोबाइल, रेफ्रिजरेशन, प्रॉडक्शन, ऑटोमेशन यांसारख्या अनेक इंजिनीअरिंग क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेताना विचार करून महाविदयालय निवडावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये प्लेसमेंट होऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळेल तसेच उद्योजकता व नाविन्यपूर्ण प्रकल्प करण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य मिळेल. पालकांनी ह्याबाबींवर विशेष लक्ष देणे गरचेचे आहे .महाविद्यालय आणि आवडणारी शाखा यांचे योग्य नियोजन करूनच निर्णय घ्यावा आणि अर्ज भरताना पसंतीक्रम ह्या पद्धतीने भरावा,असे आवाहन डॉ. अमोल पोतगंटवार, संचालक, SOCSE, संदिप विद्यापीठ, नाशिक ह्यांनी केले.
विद्यार्थी व पालकांसाठी:
- सीईटी, नीट, जेईई आणि बारावीच्या गुणांचा विचार करून योग्य क्षेत्राची निवड करा.
- मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी कौशल्य विकास गरजेचा.
- अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना ऑनलाईन तसेच ऑफलाइन इंटर्नशिप प्रकल्पांवर भर द्यावा.
- बीसीए, एमसीए, कॉम्युटर सायन्स मध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत रोजगारांच्या अनेक संघी.
- पालकांनी मुलांची आवड बघुन त्यांना क्षेत्र निवडीसाठी मदत करावी, हवे असल्यास त्या क्षेत्रातील एक्सपर्टस ची मदत घ्यावी.
संदिप युनिव्हर्सिटी UGC मान्यताप्राप्त, नाशिक (महाराष्ट्र) येथे आहे. २०१७ मध्ये युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली.संदिप युनिव्हर्सिटी मध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. School of Computer Sciences & Engineering (SOCSE) सदैव उत्कृष्ट प्लेसमेन्ट साठी बांधील आहे. सांगायला अभिमान वाटतो की चालू शैक्षणिक वर्षात आमच्या कॉलेज मधील २०० पेक्षा जास्त विद्यार्थी नामांकित आयटी कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या स्थान मिळालेले आहे.
ऑफर केलेल्या प्लेसमेंट पॅकेजच्या संदर्भात, आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आमच्या विद्यार्थ्यांकडे आहे.आकर्षक ऑफर मिळाल्या. या वर्षी आमच्या विद्यार्थ्यांना दिलेले सर्वोच्च पॅकेज प्रभावशाली 7.25 LPA (लाख प्रतिवर्ष), जे त्यांच्या क्षमता आणि मूल्याचा पुरावा आहे,शिवाय, किमान पॅकेजचाही उल्लेख करण्यात आम्हाला अभिमान वाटतो,आमच्या विद्यार्थ्यांना ऑफर केलेले प्रशंसनीय पॅके 3.5 LPA (लाख प्रतिवर्ष), आहे .
School of Computer Sciences & Engineering (SOCSE), संदिप विद्यापीठ, नाशिक येथील उपलब्ध असलेले कोर्सेस:
पदवी अभ्यासक्रम:
- बी. टेक. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग (CSE)
- बी. टेक. कॉम्प्युटर सायन्स – स्पेशलायझेशन इन
- क्लाऊड टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी (CTIS)
- सायबर सेक्युरिटी अँड फोरेंसिक (CSF)
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AIML)
- बी.एस सी. (सी एस) स्पेशलायझेशन इन AI,ML & VR. (BSC. AIML & VR)
- बीसीए (BCA)
पदव्युत्तर अभ्यासक्रम:
- एम.टेक. (क्लाऊड टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी-( ESDS Software Solution Limited,Nashik)
- एमसीए (MCA)
- पी जी डिप्लोमा इन ॲडव्हान्स क्लाऊड कम्प्युटिंग (PGDACC- ESDS Software Solution Limited,Nashik)
कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग व स्पेशलाइज्ड कोर्सेस पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या मिळणाऱ्या संधी:
- सॉफ्टवेअर डेव्हलपर
- फुल स्टॅक सॉफ्टवेअर डेव्हलपर
- डेटा विश्लेषक
- डेटा सायंटिस्ट
- डेटाबेस प्रशासक
- सायबर सुरक्षा तज्ञ
- डेटा अभियंता
- मशीन लर्निंग इंजिनियर
- संगणक नेटवर्क आर्किटेक्ट
- सिस्टम प्रशासक
- चाचणी ऑटोमेशन अभियंते
- गेम डेव्हलपर
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स / मशीन लर्निंग डेव्हलपर
- मशीन लर्निंग आर्किटेक्ट
- संशोधन शास्त्रज्ञ
- एनएलपी अभियंता
- व्यवसाय बुद्धिमत्ता विकसक
- फुल स्टॅक एमएल विकसक
- उत्पादन व्यवस्थापक
- सॉफ्टवेअर आर्किटेक्ट

संचालक, स्कूल ऑफ कॉम्पुटर सायन्सेस अँड इंजिनीरिंग (SOCSE),
संदिप विद्यापीठ, नाशिक