सुमारे 40 वर्षांपूर्वी फक्त मोझॅक टाईल्स उत्पादन करणाऱ्या एका कंपनीपासून आज देशातील टाइल्सचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ ( श्रेणी ) असणारी कीर्ती टाइल्स कंपनी ही नाशिक जिल्ह्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी केले . ते कीर्ती टाइल्स च्या मालेगावा तील भव्य 7500 स्क्वेअर फुट च्या शोरुम च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
वर्ष 1980 च्या सुमारास ईश्वरदयाल नवाल यांनी मोझॅक टाईल्स निर्मितीचा एक कारखाना मालेगावमध्ये सुरु केला .ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व अर्थकारण विकास या हेतूने मालेगाव मध्ये सुरु झालेल्या या कारखान्यात जे निर्माण करायचे ते उत्तम आणि दर्जेदारच या ध्येयामुळे कीर्ती टाईल्स तर्फे बनविलेल्या मोझॅक टाईल्स राज्यात व देशात विविध ठिकाणी पोहोचू लागल्या आणि लोकप्रिय झाल्या.
त्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे 1998 मध्ये ईश्वरदयाल नवाल यांचे सुपुत्र पवन नवाल यांनी हा व्यवसाय सांभाळला त्यांनी व्यवसायाच्या विस्ताराला सुरुवात केली .आधुनिक तंत्रज्ञान ग्राहकाची रुची ,नवनवीन डिझाइन्स आणि टाइल्सचे विविध प्रकार यावर सतत संशोधन करून त्यंनी बाजारात नवीन टाईल्स आणायला सुरुवात केली .
आजमितीला किर्ती टाइल्सतर्फे अनेक प्रकारातील, विविध आकारातील तसेच विविध फिनिशच्या टाइल्सचे 5000 हुन अधिक प्रकारच्या विविध डिझाइन्स चे निर्माण केले जाते . हे प्रकार असे-
1)रिफ्लेक्टीव इंटरलॉकिंग ब्लॉक /पेव्हर ब्लॉक
2)विर्टिफाईड टाईल्स
3)बाथरूम टाईल्स
4)नैसर्गिक स्टोन क्लॅडिंग
5)क्लॅडो ब्रीक्स
6)स्लिम टाईल्स
7)थर्मोस्टॅट टाईल्स (कुल रूफ टाईल्स )
8)हॅन्डक्राफ़्टेड होम टाईल्स
9)फुल बॉडी १५ मीमी (किचन ओट्यासाठी)
10)कस्टमाइज्ड टाईल्स
11)वॉलपेपर टाईल्स
12) डिजिटल वॉल टाईल्स
१४ )पार्किंग टाईल्स
१५) कल्चर्ड स्टोन्स
१६) नॅचरल सॅण्ड स्टोन्स
उत्कृष्ट दर्जा,नाविन्यपूर्ण निर्मिती यासाठी किर्ती टाइल्सला महाराष्ट्र शासनातर्फे देखील गौरविण्यात आले आहे .वर्ष 2008 मध्ये किर्ती टाइल्सतर्फे मॅग्नेट सिरॅमिक या ब्रँडद्वारे सिरॅमिक टाइल्सच्या क्षेत्रात देखील पदार्पण केले असून येत्या काळात किर्ती टाईल्स आपल्या व्यवसायाचा विस्तार सॅनिटरी फिटींग आणि सॅनिटरी वेअर या क्षेत्रात देखील करणार आहे .
या प्रसंगी शीतल नवाल, तसेच मालेगाव तसेच नाशिक मधील अनेक उद्योजक तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.