हृदय विकाराचा झटका आल्यानंतर एन्जिओप्लास्टी करून रक्तवाहिनी मोकळी केली जाते पण या रक्तवाहिनीमध्ये कॅल्शियमचा कडक ब्लॉक असेल तर बायपास शस्त्रक्रिया करावी लागते पण या वर नाशिक च्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नुकत्याच झालेल्या शॉकवेव्ह इंट्रा वेसस्कुलर बलून लिथोट्रिप्सी या तंत्राने डॉ. हिरालाल पवार यांनी यशस्वी उपचार केला आहे
नाशिकमधील आरोग्यसेवा आता महाराष्ट्रातील अन्य प्रगत शहरांपेक्षा उजवी ठरत असून येथे असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व कुशल डॉक्टर तसेच तुलनात्मक वाजवी दर यांच्या मुळे मुंबई पुण्यावरून रुग्ण हे उपचार उपचारासाठी नाशिकला येत आहेत. अशीच एक दुर्मिळ शस्त्रक्रिया नुकतीच नाशिकच्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे झाली अशी माहिती सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे महाव्यवस्थापक संजय चावला यांनी दिली.
सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने गेल्या 8 वर्षाच्या कालावधीत रुग्णसेवेचे नवे आयाम स्थापित केले असून अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. गत 8 वर्षात हॉस्पिटल मध्ये २०००० हून अधिक एन्जिओप्लास्टी व एन्जिओग्राफी पार पाडल्या असून येथे जगातील सर्वोत्तम अझुरीयन कॅथ लाब तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उत्तम व अनुभवी डॉक्टरांची टीम कार्यरत आहे असेही संजय चावला म्हणाले.
या शस्त्रक्रिये बाबत व त्यासाठी वापरल्या गेलेल्या शॉकवेव्ह इंट्रा वेसस्कुलर बलून लिथोट्रिप्सी या तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या डॉ. हिरालाल पवार यांनी दिली.
ते म्हणाले की मूळची मुंबई येथील ६५ वर्षीय महिला जी आत्ता नाशिकमध्ये स्थायिक आहे तिला काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला .परंतु नाशिक पेक्षा मुंबईतील हॉस्पिटल चांगले उपचार करतील या विचाराने त्यांनी मुंबईतील काही रुग्णालयांना दाखवले . मुंबई येथे एन्जिओग्राफी झाल्यानंतर मुख्य रक्तवाहिनेमध्ये कॅल्शियमचा कडक ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रक्तवाहिनेमध्ये जागाच नसल्याने तेथे स्तेंट टाकणे अशक्य होते.अश्या वेळी रक्तवाहिनी फुटून रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो . अनेक डॉक्टरांनी तर एन्जिओप्लास्टी करायला असमर्थता व्यक्त केली . अश्या वेळी रुग्णाला काही जणानी बायपास शस्त्रक्रिया देखील सुचवली पण मुंबई मध्ये त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात होता .
त्यामुळे काही नातेवाईक यांच्या सूचनेवरून रुग्णाने नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटल च्या हृदय रोग तज्ञ डॉक्टर हिरालाल पवार यांचा सल्ला घेतला तेव्हा डॉ. हिरालाल पवार यांनी शॉकवेव्ह इंट्रा वेसस्कुलर बलून लिथोट्रिप्सी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले व अवघ्या एक ते दीड तासात ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली
शॉकवेव्ह इंट्रा वेसस्कुलर बलून लिथोट्रिप्सी म्हणजे काय ??
ही अमेरिकन अत्याधुनिक अशी उपचार पद्धती आहे. या तंत्रामध्ये आय वी एल बलून मधील एमिटर च्या माध्यमातून अल्ट्रा हाय प्रेशर सोनिक व्हेव्हज द्वारे हृदयातील रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यातील कॅल्शियम ला शॉक दिला जातो .त्यामुळे हे जमा झालेले कॅल्शियम बस्ट होते यानंतर धमण्याचा आकार मोठा होऊन धमण्याचा आकार मोठा करण्यात येतो त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो . सदर शस्त्रक्रिया ही हातातून करण्यात आली .
या प्रकारच्या उपचार पद्धती मध्ये तुलनेने कमी वेळ लागतो आणि शस्त्रक्रिया च्या सफलतेचे प्रमाण देखील अधिक असते तसेच साईड इफेक्ट ची शक्यता कमी असते .
