जी एम फाऊंडेशन्स ‘ग्राईक दृष्टी आरोग्य साधना पुरस्कार २०२१-२२’ पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी व्यासपिठावर विको लेबाॅरटरीचे व्यवस्थापकीय संचालक संजीवजी पेंढारकर, नासिक आय एम ए चे अध्यक्ष हेमंत सोनानीस, मर्सिडीज बेंज सिल्वर स्टारच्या प्रमुख, (ह्युमन रिसोर्स) अंकीता चांदवडकर, आ. सिमाताई हिरे, रामकृष्ण पब्लिकेशन्सचे संस्थापक मनीष पात्रीकर, सह-संस्थापिका मंजुषा पात्रीकर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतांना सामाजिक कार्यात योगदान देणा-या डाक्टर्सना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात डॉ सौ कृष्णा पवार, डाॅ अनिता हिरे, डाॅ विशाल पवार, डाॅ किरण शिंदे, डाॅ प्राची पवार, नासिक. डॉ सुधिर पाटील, देवळा. डाॅ. पंकज शहा व दर्शना शहा, डाॅ विनोद कुमार जैन व सोनाली जैन, डॉ श्रीधर पाटील, वैद्य जयंत जहागीरदार, जळगांव. तिरूमला आॅईल रिफायनरी प्रा लि च्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे, बीड यांच्या वतीने एरिया सेल्स मॅनेजर वैभव फिरके यांना ‘ग्राहक दृष्टी आरोग्य साधना पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सायकलचे आरोग्यदायी महत्व समाजात रूजविणा-या व नुकतीच पंढरपुर सायकल वारी करून आलेल्या नासिक सायक्लीस्ट फाऊंडेशनचे अध्पयक्ष राजेंद्र वानखेडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सुत्रसंचालन हिमिका भादुरी यांनी केले तर आभार मनीष पात्रीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते करीता सिल्वर स्टार मर्सिडीज बेंज चे निरज टाक तिरूमला आॅईल रिफायनरी प्रा लि चे ललीत फीरके, विशाल घोलप, युतिका नॅचरल्स प्रा लि चे संघपाल तायडे, दि ब्रेकींग पाॅईंटचे मनीष महाजन तसेच प्रणव पात्रीकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील आयएमए पदाधिकारी व सदस्य, प्रतिथयश व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.