मेघालय राज्यातील एक छोटेसे गाव जे पूर्वी “सोहरा” म्हणून ओळखले जात असे, 16 ते 18 च्या दशका मधे येथे आदिवासी सियंस (सरदार व राजा) ख्येरीमचे राज्य होते. इ. स. 1883 मध्ये खासी हिल्स हे ब्रिटीशांच्या अधीपत्याख्याली आली. ब्रिटिश सोहराला “चुरा” म्हणून संबोधित करायचे म्हणून हे गाव “चेरापूंजी” या नावााने विकसित झाले.
चेरापूंजी हे समुद्रसपाटी पासून 4690 फूटवर वसलेले आहे. यास अतिवृष्टिचे ठिकाण म्हणून पण ओळखले जाते. यास पृथ्वीवरील सर्वात आद्र (ओला) असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. चेरापूंजी या शब्दाचा अर्थ म्हणजे “संत्राची जमीन” आसा आहे.
येथे आकर्षण म्हणजे येथील पुल आहे गावा जवळच उमशींग रूट ब्रिज, मावसा रूट ब्रिज, रितिमॅन रूट ब्रिज आणि नॉनग्रीट गावात डबल डेकर रूट पूल यासारख्या सजीव रूट पूल आहेत.मुख्य पावसाळ्या मध्ये अनेक निसर्गरम्य धबढ़ाबे अनुभवन्यास मिळते.
मॉलिनोंग
चेरापूंजी जवळच मॉलिनोंग नावाचे अतिशय निसर्गरम्य व सुंदर खेड़ेगाव आहे. ज्यात 90% साक्षर लोक राहतात व त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
मॉलिनोंग हे खेड़े सगळ्यात जास्त स्वछतेसाठी प्रसिद्ध आहे. डिस्कवर इंडिया या पुस्तकाने 2003 मधे आशिया खंडातील सगळ्यात स्वच्छ गाव म्हणून घोषील केले.
दावकी
भारतामधील मेघालय राज्यातील पश्चिम जेंटिया हिल्स जिल्ह्यामधील भारत बंगला सिमेवर वसलेले छोटेसे गाव जिथुन भारता मधून बांग्लादेशला जाण्याचा मार्ग आहे. हा मार्ग मुक्ख्यता बांग्लादेेशेतात कोळसा वाहतुकिसाठी वापरला जातो या रस्त्यावरुन दररोज सुमारे 500 ट्रक सिमा ओलंडतात, येथील दावकी ब्रिज जो झूलता पुल म्हणून ओळखला जातो हा 1932 मधे ब्रिटीशांनी उमगोट नादिवर बांधला आहे.
दावकी जवळ असलेली उमगोट नदी भारत व बांग्लादेशच्या सिमेवरुन वाहते. तिचे पाणी स्पटीका सारखे स्वच्छ आहे जिच्यातून नदीच्या खालचा तळही दिसतो. याच्या मधे केलेल्या नौकाविहार हा अतिशय आनंद देणारा व अविस्मर्णीय ठरतो.
मंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल्स, औरंगाबाद.