मराठी पुरातत्वशास्त्रज्ञाने लावलाय या पौराणिक गुफांचा शोध…

Advertisements

भीमबेटका मध्यप्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातिल एक प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळ, भोपाळ पासून किमान 45 किमी दक्षिणेस विंध्य पर्वत रांगात वसलेल्या या गुहा आहेत, येथील 10 चौ.किमी परिसरात किमान 800 गुहा आहेत त्यातील 500 गुहांमधे ऐतिहासिक भित्तिचित्रे काढलेली आहेत, ही भित्तिचित्रे आदिमानव संस्कृतिचे प्रतीक सुद्धा मानले जाते, सुमारे एक लाख वर्षा पूर्वी ही आदिमानव लोकांची राहण्याची जागा आसावी असे ऐकन्यात येते, तेथील पाषानयुगीन भित्तिचित्रे इ. स. 30,000 वर्षापूर्वीची असल्याची मानली जातात, ही चित्रे भारतातील सगळ्यात प्राचीन चित्रे मानली जाते, या ठीकाणाचे नाव महाभारत ग्रंथा मधील महाबलवान भीम यांच्या नावा वरुन ठेवण्यात आले आहे असे ही म्हंटले जाते की येथे भीम यांची बसायची जागा होती त्यामुळे याला भीमबेटका ऐसे म्हणतात.

या गुहाचा शोध 1957 मध्ये मराठी पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. श्रीधर विष्णु वाकणकर यांनी लावला.असे म्हणतात की वाकणकर हे दिल्लीहून भोपाळला रेल्वेने जात असताना त्यांना डोंगरात काही खोदकाम केलेले दिसले तेव्हा. त्यांनी तिथे जाऊन त्या गुफा शोधून काढल्या. त्यानंतर त्यांनी तिथे राहून तेथील चित्रांचा सखोल अभ्यास केला, त्या चित्रांमधे विविध प्राणी, पक्षी, झाडे, जणावरांची शिकार करण्याची चित्रे जी अदिमानवाने त्याच्या जीवनशैली मधे अनुभवली होती ती तिथे काढलेली आहे, काही गुफांमध्ये लहान बाळाच्या हाताचे ठसे व वेगवेगळे प्राणी जसे हत्ती, वाघ, सिंह, घोड़ा, हरीण, चित्ता, बैल, मोर इत्यादि चित्रे आहेत तर काही गुफा मध्ये एक मिरवणुकीचे चित्र आहे .ज्यात घोड्यावर बसलेले माणस हातात शस्त्र सोबत काही वाजंत्रि वाद्य वाजवताना दिसतात. 

एका गूफेमध्ये एक समोरिल पाय ऊँचावलेला एका पांढरा शुभ्र घोडयाचे अतिशय देखणे   चित्र दिसते ..या वरुन असा पुरावा देखील मिळतो की घोड़ा हा भारता मध्ये अस्तित्वात होता, ते अरबी लोकांणी भारतात आणले असा समज खोटा ठरतो.

भीमबेटका जाण्यासाठी भोपळ येथे रेल्वेने किवा विमानाने प्रवास करून पुढे रोड ने जाता येते .

मंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल्स, औरंगाबाद.

Leave a Reply

You cannot copy content of this page