महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छता ही सेवा – गार्बेज फ्री इंडिया या स्वच्छता अभियान अंतर्गत क्रेडाई नासिक मेट्रो ने आयोजित केलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया क्वालिटी सिटी नाशिक अंतर्गत नाशिक शहरात तीन ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली .
या मोहिमेअंतर्गत नाशिक मधील सर्वसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या तसेच गरजेचा ठिकाण म्हणजे बस स्टॅन्ड ची निवड करण्यात आली .जवळपास 50 हून क्रेडाई सभासदांनी ठक्कर बाजार बस स्टॅन्ड , मेळा बस स्टॅन्ड व महामार्ग बस स्टॅन्ड येथे स्वच्छता केली .या उपक्रमात असंख्य प्रवासी आणि नागरिक देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या बाबत माहिती देताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की स्वच्छ आणि सुरक्षित शहर ही प्रत्येक विकसित शहराची पहिली ओळख असते .अश्या समजुपयोगी कार्यक्रमात क्रेडाई नेहमीच अग्रेसर असते . हा उपक्रम फक्त एक तास न करता टप्प्याटप्प्याने तो दिवसभर राबविला गेल्याचे पण त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी क्वालिटी सिटी नाशिकचे प्रवर्तक जितूभाई ठक्कर , माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील ,नेमीचंद पोतदार तसेच सहसचिव व कार्यक्रमाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ सभासद डीजे हंसवानी ,अविनाश आव्हाड ,श्रीकांत कुलकर्णी ,मॅनेजिंग कमिटी मेंबर सागर शहा ,विजय चव्हाणके , सतीश मोरे तसेच सभासद व सर्व क्रेडाई कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते .
