मोदी सरकार च्या विविध निती आणि धोरणे या देशाच्या प्रगती मध्ये दूरगामी परिणाम करणाऱ्या असून आत्मनिर्भर भारत या संकल्पाने उद्योजकांना व्यवसायाच्या अपरिमित संधी असल्याचे प्रतिपादन केंद्र सरकारच्या एम एस एम इ बोर्ड चे सदस्य व भाजपा उद्योग आघाडी चे राज्य अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केले. ते ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क ग्लोबल ( बीबीएनजी) च्या छत्रपती संभाजी नगर चॅप्टर चा पहिला वर्धापन दिन व नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहोळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात अमृत काळातील व्यवसाय संधी या विषयावर बोलत होते.
या प्रसंगी बीबीएनजी चे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, सहयोगी संचालक विवेक देशपांडे , सचिव अरविंद कोरालकर, सहसचिव महेश देशपांडे व विभागीय संचालक डॉ.अभिजीत चांदे हे मान्यवर उपस्थित होते.
दळणवळण, रेल्वे, तंत्रज्ञान, संरक्षण , सौर ऊर्जा , वेस्ट मॅनेजमेंट अश्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. पारदर्शी कारभार असल्याने या क्षेत्रातील संधी चा लाभ व्यवसायिकांनी घ्यावा. ब्राह्मण समाजाने नेहमीच राष्ट्र समृद्ध करण्याच्या कार्यात अग्रेसर भूमिका घेतली असल्याचे ही त्यांनी नमूद केले .
प्रदीप पेशकार
या प्रसंगी छत्रपती संभाजी नगर चॅप्टर चे वर्ष २०२३ – २४ साठी नूतन पदाधिकारी चॅप्टर हेड शैलेश देशपांडे , चॅप्टर सचिव राहुल देशपांडे व कोषाध्यक्ष सौ गीता आचार्य यांनी पदभार स्वीकारला.
देशातील सर्वशाखीय आणि सर्व भाषिक ब्राह्मण व्यवसायिकांचे सर्वात मोठी बिझिनेस नेटवर्क संस्था ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क ग्लोबल ( बीबीएनजी) २०१२ मध्ये सुरू झाली. बीबीएनजी आज देशातील ३० हून अधिक शहरे तसेच परदेशात विस्तारली आहे. छत्रपती संभाजी नगर येथे सुमारे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या चॅप्टर मधून व्यवसायाच्या अनेक संधी तसेच प्रशिक्षण येथील ब्राह्मण व्यवसायिकांना मिळाले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीपाद फडे , मार्तंड कौसडीकर, श्रीधर कुलकर्णी,दीप्ती देशपांडे, वैशाली जोशी , अभिषेक दसगावकर सुहास मुंगी, मयूर देशपांडे, चिन्मय महाजन ,शुभम जोशी ,माधुरी दानेकर व सर्व सदस्य यानी परिश्रम घेतले.