इंडिअन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक या बालरोगतज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेच्या महिला विभागातर्फे येत्या ३० व ३१ जुलै रोजी महिला बालरोगतज्ञाच्या पहिल्याच राष्ट्रीय परिषद ‘ फेमपेडीकॉन – २०२२ ‘ चे आयोजन नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात करण्यात आले असून केवळ महिला बालरोगतज्ञांची ही पहिलीच राष्ट्रीय परिषद आहे. या परिषदेचे उद्घाटन परिषदेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे.
समाजाचे सक्षमीकरण करणे हे या दोन दिवसीय परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असून ह्युमन मिल्क बॅंक, लहान मुलांचा संतुलीत आहार, लसीकरण, मुलींच्या आरोग्याचे सबलीकरण, मासिक पाळी व आरोग्य, मुलगा -मुलगी समानता, कोविड आजाराचे नंतरचे पडसाद अशा अनेक वैविध्यपूर्ण व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या विषयांवर यात चर्चा होणार असून खास परिषदेसाठी नाशिक मध्ये येणाऱ्या देशातील अनेक नामांकित तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्स वूमन विंग च्या अध्यक्षा डॉ. हिमाबिंदू सिंग, सचिव डॉ. संगीता लोढा (बाफना), सेंट्रल इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार, डॉ. उपेंद्र किंजवडेकर, डॉ .प्रमोद जोग , महा इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सचे अध्यक्ष डॉ. हेमंत गंगोलिया, सचिव डॉ. अमोल पवार, डॉ .रमाकांत पाटील, डॉ .तृप्ती महात्मे ,डॉ .सुलभा पवार अशा दिग्गज बालरोग तज्ञांचे या परिषदेस योगदान लाभले आहे.
परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध चर्चा सत्रे तसेच ज्ञान संवर्धनासाठी सत्रे असून परिषदेच्या दुसऱ्या दिवशी वोकेथोन तसेच चेयर आणि हास्य योगा चे आयोजन करण्यात येणार आहे. परिषदेमध्ये महिला बालरोगतज्ञांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पण आयोजन यात करण्यात आले आहे. परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मानसिकरीत्या अपंग असणाऱ्या मुलांनी त्यांच्या कलाकृतीतून बनविलेल्या सुंदर वस्तूंचे प्रदर्शन यात आयोजित करण्यात आले आहे.भारताच्या विविध भागातून अनेक महिला बालरोगतज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत .
या परिषदेसाठी माजी राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.स्वाती भावे , युनिसेफ च्या सल्लागार डॉ.एलिझाबेथ के ई, डॉ विवेक सिंग, डॉ . शुश्मिता घोष ,डॉ.आशा बेनाकप्पा ,डॉ.बेला वर्मा, डॉ.संध्या खडके, डॉ.स्मिता मिश्रा, डॉ.संगीता यादव , डॉ.जोगिंदरसिंग टूटेजा, , डॉ.श्वेतल भट्ट, डॉ.निलम मोहन डॉ.पियाली भट्टाचार्य असे अनेक नामांकित तज्ञ परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत