सध्या सरकारची धोरणे हि उद्योग आणि उद्योजक पूरक असून उद्योजक हे देशात समृद्धी आणण्याचे काम करतात . ब्राह्मण उद्योजकांची देशातील सर्वात मोठी संस्था ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क ग्लोबल (बी बी एन जी )सोबत असलेले सर्व ब्राह्मण व्यावसायिक देशाला समृद्धी आणण्याच्या कार्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले .ते बी.बी.एन.जी. तर्फे पुण्यामध्ये आयोजित ‘परिवर्तन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये समारोपाप्रसंगी बोलत होते . प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ब्राह्मण उद्योजकांना ‘उद्यम कौस्तुभ ‘या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले .
जीवन गौरव पुरस्कार
१. नाशिक चे उद्योजक डेल्टा फिनोकेम चे शरयू देशमुख व दत्तात्रय देशमुख
२. माजी आमदार निशिगंधा मोगल आणि आर्किटेक्ट राजाभाऊ मोगल
उद्यम कौस्तुभ पुरस्कार्थी
डॉ .अतुल वडगावकर ( नाशिक ) , एम.जी कुलकर्णी ( सिन्नर ) , श्रीराम कुलकर्णी ( मुंबई ) , सी ए दिलीप दीक्षित ( पुणे ) , धनंजय जोशी ( पुणे ) , पी.यू.कुलकर्णी ( औरंगाबाद) व मधुरा कुंभेजकर ( नाशिक )
प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले कि ,सध्या व्यवसायाचे स्वरूप झपाट्याने बदल त आहे . आमची कोठेही शाखा नाही यापासून सुरु झालेला व्यवसाय आज विस्तारत आहे . सर्वच प्रकारच्या उद्योगात ब्राह्मण व्यवसायिक अग्रेसर आहेत. तसे बघायला गेला तर जगभरातील सर्वच नामांकित कंपन्यांमध्ये मध्ये भारतीय काम करत आहेत. पण देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या नवनवीन शोधांचे भारतीयांनी मालक होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले .
आधी सकाळच्या सत्रात परिषदेचे उदघाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चैतन्य महाराज देगलुरकर यांची उपस्थिती होती. यावेळी बी. बी. एन. जी.चे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुळकर्णी ,उपाध्यक्ष मुकुंद कुळकर्णी तसेच परिषदेचे समन्वयक सुयोग्य नरवणे हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले नोकरी करणारा समाज अशी ओळख असणाऱ्या ब्राह्मण समाजाचे परिवर्तन आता नोकरी देणारा समाज असे होत आहे . ब्राह्मणांचे जीवन हे जगाच्या विकासासाठीच असते याचे अनेक ऐतिहासिक व पौराणिक दाखले देखील असल्याचे त्यांनी नमूद केले .भगवत गीतेमध्ये कर्म आणि कर्तृत्व याचा समन्वय साधण्याचे ज्ञान मिळते . तसेच धर्म,मोक्ष ,काम आणि अर्थ हे चार पुरुषार्थ असून काम आणि अर्थाला धर्म आणि मोक्षाचे बंधन घातल्यास आदर्शवत जीवन जगता येते असेही ते म्हणाले .
या परिषदेमध्ये उद्योजक प्रदीप पेशकार ,उदय निरगुडकर,अमित महाजन ,शिल्पा महाजन,लीना बोकील, अजिंक्य कुलकर्णी ,आदित्य कुलकर्णी ,केदार चितळे ,परीक्षित प्रभुदेसाई ,अमित घैसास ,संजय पैठणकर ,सुधीर गाडगीळ यांनीदेखील उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले .परिषदेमध्ये देशविदेशातील ब्राह्मण उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.