१९७० पासून नाशिकच्या सातपूर औद्योगिक क्षेत्रात कार्यरत स्वदेशी बहुराष्ट्रीय कंपनी इपिरॉक मायनिंग इंडिया लि. ने गत ५० वर्षात नाशिक च्या औद्योगिक प्रगती मध्ये सकारात्मक योगदान दिले असून सुमारे नाशिक च्या इपिरॉक मध्ये निर्मित मायनिंग उद्योगात वापरले जाणारे विविध उपकरणे आज जगातील सुमारे १५० देशमध्ये निर्यात केले जात असल्याची माहिती इपिरॉक नाशिकचे महाव्यवस्थापक अरविंद पाटील यांनी दिली .
ते पुढे म्हणाले की, निर्याती शिवाय नाशिक मध्ये इपिरॉक द्वारे विविध महाविदयालयातून प्लेसमेंट ड्राईव च्या द्वारे रोजगार निर्मिती, तसेच विविध लघुउद्योग यांना काम या माध्यमातून शहराच्या अर्थकारणाला हातभार तसेच शिक्षण आणि पाणी या साठी अनेक उपक्रमातून समाजासाठी भरीव कार्य करण्यात आले आहे. नाशिक मध्ये सुमारे ६०५०० स्क्वे . मी . एवढ्या विस्तीर्ण परिसरात कंपनीचे उत्पादन होत असून येथे ५०० हून अधिक कुशल कर्मचारी येथे कार्यरत आहेत . स्वीडन मधील स्टाॅकहोम येथे मुख्यालय असलेल्या इपिराॅकचा विस्तार हा जगातील सुमारे १५० देशांमध्ये असून भारतात नाशिक आणि हैदराबाद येथे कंपनीचे उत्पादन होते.
महिलांना समान संधी देणे हा देखील इपिरॉक ची एक सकारात्मक बाब असून आजमितीला महिला देखील सर्वच विभागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इपिरॉक मध्ये काम करत आहेत
आजपर्यंत काही शासकीय नियमांमुळे महिलांना खाण क्षेत्रात मर्यादित स्वरूपात कार्य करता येत होते .परंतु आता नवीन नियमावलीनुसार हे क्षेत्र महिलांसाठी खुले झाले आहे . या नंतर इपिरॉक तर्फे त्यांनी उत्पादित केलेल्या उपकरणांची अगदी खाणी मध्ये जाऊन देखभाल करण्यसाठी महिलांची नेमणूक करण्यात आली आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केल्याने संस्थेमध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकतात . हे लक्षात घेऊन खाण उद्योगात नाशिकचे नाव जागतिक नकाशावर आणणा-या नाशिकच्या इपिरॉक मायनिंग इंडिया लि . ने आता आपल्या उद्योगात अधिकाधिक महिलांना संधी देण्याचे ठरवले आहे.
आगामी काळात इपिरॉक तर्फे ऑपरेशनल भूमिकांमध्ये महिलांची संख्या वाढवणार असल्याचे सांगत अरविंद पाटील म्हणाले की, महिला या सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत . त्यांच्या सहभागाने कामात कलात्मकता व नावीन्य येते. तसेच कंपनीमध्ये चांगल्या संवादाची निर्मिती होते . महिला सक्षम झाल्यास कुटुंब व देश सक्षम होण्यास निश्चित मदत होईल.