कधी काळी आर्थिक / सामाजिक / राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण अश्या ब्राह्मण समाजाची आजची अवस्था ही अतिशय नाजूक आहे..
सुरवातीपासून ब्राह्मण समाज अधिकांश उजव्या विचारसरणी च्या प्रभावाखाली आहे.. त्यामुळे डावी विचारसरणी ने नेहमीच ब्राह्मण समाजासाठी खूप भरीव काम केले नाही ..
आता गम्मत अशी ज्या विचारसरणी चा अधिकांश ब्राह्मण समाज अनुनय करतो त्या विचारसरणी ने समाज म्हणून ब्राह्मणाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली आहेत . ना आर्थिक दृष्ट्या ..ना सामाजिक दृष्ट्या या उजव्या विचारसरणी ने ब्राह्मण समाजास काहीही दिले नाही ..
अगदी मंडल कमिशन च्या स्थापने पासून ,राज्यात वाढीव आरक्षण असो अथवा सुप्रीम कोर्टाने एत्रोसिटी चा निकाल दिल्यानंतर त्याच्या विरोधात त्वरित नोटीफिकेशन काढून तो निर्णय रद्दबदल करणे असो , मेडिकल मधील वाढीव आरक्षण असो .. अश्या प्रकारच्या निर्णयाने ब्राह्मण समाजाच्या भविष्यावर , त्यांना मिळू शकणाऱ्या संधीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ब्राह्मण समाजातील अगदी काही मोजक्या जणांना राजकीय नेतृत्वाची संधी देखील मिळाली पण त्या संधिमुळे समाजाचे काही भले झाले आहे असे देखील बघण्यात आले नाही.
मग प्रश्न असा की आपल्या समाजाच्या या बिनशर्त पाठिंबा मिळाल्याने राजकीय पक्षांनी आपल्याला गृहीत धरले आहे का ?? आपल्या पुढील पिढीची शैक्षणिक आणि रोजगाराची वाट सध्या घेतल्या गेलेल्या अनेक निर्णयामुळे अत्यंत बिकट झाली असून त्याच्या या स्थितीस आपला बिनशर्त पाठिंबा कारणीभूत ठरत असेल तर येणाऱ्या पिढ्या चे आपण गुन्हेगार ठरणार आहोत. आता वेळ आली आहे ती समाज म्हणून एकत्र येण्याची .’ जो समाज की बात करेगा….समाज उसके बारे मे सोचेगा’ हे ठणकावून सांगण्याची .. नाहीतर आपले भविष्य अत्यंत अवघड आहे .