नाशिक मध्ये कार्यरत उद्योजक यांच्या समस्या सोडविणे , नाशिक मध्ये नवे उद्योग यावेत जेणे करून नाशिक मध्ये रोजगार तसेच व्यवसाय निर्मिती होईल या साठी विविध स्तरावर प्रयत्न तसेच पाठपुरावा करणे, तसेच नाशिक चे ब्रॅण्डिंग देशात तसेच विदेशात करणे हे कार्य साधारणत औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थानी करावे असे सामान्य नाशिककर म्हणून अपेक्षा आहे.
नाशिक मध्ये सध्या अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) व नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( निमा ) या प्रमुख ओसोगिक संस्था आहेत . परंतु अश्या प्रकाराचं सकारात्मक कार्य या संस्था करत आहेत का ??
यातील आयमा ची द्वै वार्षिक निवडणूक आगामी काही दिवसात होत आहे. आयमा च्या पुढाकाराने किती नवे उद्योग आले अथवा उद्योगास पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी काय नेमके योगदान अश्या अनेक प्रश्नांना सत्ताधारी यांना निश्चितच सामोरे जावे लागणार .
नाशिक मध्ये परिवर्तन ही सामान्य बाब आहे .अनेक निवडणुकीत नाशिककरांनी चांगल्या कार्य करण्यासाठी नेहमीच परिवर्तनाला साथ दिली आहे. हेच परिवर्तनाचे वारे आयमा निवडणुकीत देखील होणार का ??
अनेकदा बदल झाल्याने नवीन चेहरे समोर येतात व त्यांची नवीन उमेद ,नव्या कल्पना यांनी संस्था पुढे जाते .असाच काहीसा विचार आयमा मध्ये रुजताना दिसत आहे .