अंधश्रध्दा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोण समिति महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ उत्कृष्ट संस्था व उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार नाशिक येथील आशिर्वाद सेवाधाम ट्रस्ट संचालित श्रीमती . गार्डा बालसदन व सौ . तेजस्विनी आशिर्वाद पवार याना जाहिर करण्यात आला . याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष श्री.तानाजी शिंदे यानी पत्रा द्वारे कळविले आहे . आशिर्वाद सेवाधाम ट्रस्ट हे गेल्या ३० वर्षांहून अधिक वर्ष अनाथ ,वंचित ,निराधार , काळजी व संरक्षण असलेल्या बालकांचे संगोपन , शिक्षण , आरोग्य , कौशल्य विकास याच्या साठी नाशिक येथे त्रिम्बकेश्वर तालुक्यात कार्यरत आहे .
संस्थेच्या मार्फत श्रीमती . गार्डा बाल सदन (बालगृह ) विषेशतः मुलींसाठी विना अनुदानित तत्वावर , शाशकीय अनुदाना शिवाय हे कार्य पार पडत आहे.या बालसदनात प्रवेशित बालिका यांचे प्राथमिक , माध्यमिक व उच्च शिक्षण तसेच बलिकांचे संगोपन ,सक्षमीकरण, कौशल्य विकास यांच्या कड़े भर देण्याचे काम करत आहे.आशिर्वाद सेवाधाम ट्रस्ट ही संस्था खंबाळे तालुका त्रिम्बकेश्वर , नाशिक येथे ५ एकर परिसरात १३००० स्के. फिट बांधकाम बालसदन (बालगृह ) चालवत आहे.
बालसदनात मुलीच्या शिक्षणासाठी स्वतत्र कंप्यूटर लॅब (कार्यशाळा), स्टडी रूम (अभ्यास कक्ष) , वाचनालय , बेडरूम ,किचन कार्यशाळा, शिलाई कार्यशाळा असे विविध प्रकारचे आधुनिक व सांस्कृतिक माध्यमातून मुलींच्या आत्मनिर्भर ते कड़े पाउल टाकत आहे .
संस्थे मार्फत आजवर अनेक बालकांचे शिक्षण क्षेत्र , वैद्यकीय क्षेत्र , व्यवसाईक क्षेत्रात स्वताच्या स्वबळावर उभे राहण्याची कामगिरी केली आहे . बाल सदानस महिला व बालविकास , बाल कल्याण समिति यांची मान्यता प्राप्त असून ही संस्था बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत आहे .तसेच सौ. तेजस्विनी आशिर्वाद पवार या संस्थेच्या मनेजिग डायरेक्टर या पदावर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे . सौ .तेजस्विनी आशिर्वाद पवार या संस्थेचे संस्थापक महंत डॉ. रत्नाकर शिवराम पवार व संस्थेच्या अध्यक्ष डॉ .सौ सुलभा पवार यांच्या सुन आहे .
सौ. तेजस्विनी आशिर्वाद पवार यांचे मास्टर ऑफ इंजीनियरिंग कंप्यूटर या क्षेत्रात शिक्षण असून त्या संस्थेमाधिल सर्व मुलींच्या सुव्यवस्था , गरजा , अपेक्षा यांची पुर्तता करण्यासाठी स्वतः जातीने दिवसरात्र कठोर परिश्रम घेउन पूर्ण करण्याचा प्रयत्न करता .सौ. तेजस्विनी आशिर्वाद पवार याना वेळोवेळी मार्गदर्शन व सहाय्य संस्थेचे संस्थापक महंत डॉ. रत्नाकर शिवराम पवार व डॉ .सौ सुलभा पवार करत असता आशिर्वाद सेवाधाम ट्रस्ट ही संस्था नसून तर काळजी व संरक्षण, अनाथ ,वंचित गरजू मुलींचे हक्काचे घर आहे हा मानस अनेक वर्षांपासून जतन करत हे पवार कुटुंब अहोरात्र झटत आहे.
संस्थेचा व सौ. तेजस्विनी आशिर्वाद पवार यांचा उल्लेखनीय निस्वार्थी कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहिर झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे व हा पुरस्कार नक्कीच समाजातील तमाम लोकाना मनुसकिची व बांधिकिची प्रेरणा देइल असा विश्वास आहे.
कोरोनाचे शासकीय नियम पाळुन हा कार्यक्रम लवकरच पर पाडण्यात येईल.
www.anathbalkashramorphanage.org