नाशिक: आज सर्वत्र डिजीटल माध्यमातून आर्थिक व्यवहार होत असून ते सुलभ जरी असले तरी त्याचे संपूर्ण ज्ञान नसल्याने त्यामध्ये अनेकदा फसवणूक होते. त्यामुळे अश्या मार्गदर्शन केंद्राची नितांत गरज होती असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक श्रीपाद कुलकर्णी यांनी केले.
ते नाशिक चे युवा व्यवसायिक सलिल केळकर व सौ. अश्विनी केळकर यांनी नाशिककरांसाठी इंदिरा नगर भागात सुरू केलेल्या मोफत सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी नाशिक चे प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. भरत केळकर तसेच नाशिक गुन्हे विभागाचे विवेकानंद पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुंतवणूक क्षेत्रात गेल्या 12 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या क्वालिटी इन्व्हेस्टमेंटस् आणि सिक्युरिटीज् तर्फे सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 10 ते 6 मध्ये हे केंद्र सुरू राहील .
याअंतर्गत कोणीही नाशिककर डिजीटल पेमेंट तसेच आर्थिक व्यवहारांमधील साक्षरता यावर इंदिरानगर येथील केंद्रात या सेवेचा लाभ घेऊ शकतो. या प्रसंगी शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते .
अधिक माहितीसाठी 88304 13958 या नंबर वर संपर्क साधावा.