ब्राह्मण व्यवसायिक यांना जागतिक बिझनेस नेटवर्क उपलब्ध करून देणाऱ्या ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ( बीबी एनजी) या संस्थेने आता औरंगाबाद शाखेची सुरुवात केली असून त्याचा शुभारंभ काल करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व ख्यातनाम उद्योजक श्रीपाद कुलकर्णी तसेच विभागीय संचालक अभिजित चांदे हे उपस्थित होते .
२०१२ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेचा विस्तार राज्य व देशातील प्रमुख शहरे तसेच परदेशात झाला आहे.
आपल्या मनोगतात श्रीपाद कुलकर्णी म्हणाले की ब्राह्मण समाजाने नेहमीच दाता म्हणून कार्य केले आहे . बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेल्या या समाजाने व्यवसाय देखील सचोटीने केला आहे. नोकरीची कवाडे अरुंद झाल्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून समाजाने व्यवसायाकडे वळून नोकरी व रोजगार देणारे बनावे असे आवाहन देखील त्यांनी केले. बीबीएनजी तर्फे व्यवसायिक यांच्या साठी अनेक नेटवर्किंग च्या संधी तसेच प्रशिक्षण नियमित आयोजित करण्यात येते असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी औरंगाबाद शहरासाठी कार्यकारणी ची घोषणा देखील करण्यात आली ..ती अशी
शैलेश देशपांडे,सौ. गीता आचार्य,आनंद पोळं,संदीप राजहंस,श्रीधर कुलकर्णी ,अतुल ठाकुर .
कार्यक्रमासाठी शहरातील ब्राह्मण व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.