नाशिक येथील प्रख्यात मुखरोगनिदान तज्ज्ञ डॉ प्रियांका साखवळकर ह्यांच्या शोधनिबंध नुकताच नेदरलँड येथे आयोजित युरोपियन असो. ऑफ न्युरो ऑनकॉलॉजि (EANO) च्या वार्षिक परिषदेत सादर करण्यात आला.
तसेच ह्याच शोधनिबंधातील दुसऱ्या उद्देहशावरील संशोधनाची आंतराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली असून ह्याचे लवकरच शिकागो येथे रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका (RSNA) च्या वार्षिक परिषदेत सादरीकरण होणार आहे.
ह्या परिषदेत जगभरातून १०००० हुन अधिक शोधनिबंध आले होते , त्यातून ह्या शोधनिबंधाची निवड झाली . लहान मुलांच्या मेंदूचा कर्करोगावरील रेडिओ थेरपी मुळे होणारे साईड इफेक्ट्स हा ह्याचा मुख्य विषय आहेत.
डॉ साखवळकर ह्या सध्या तोंडाचा होणारा कर्करोगावर आणि त्याच्या उपचारामुळे होणारे दुष्परिणाम यावर काम करत असून ह्याबद्दल सामाजिक प्रबोधन करण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली. अत्याधुनिक उपचार पद्धती भारतात रुजवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
डॉ. साखवळकर यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश 
Advertisements