विद्यार्थ्यांसाठी बारावीचे वर्ष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे वळण असे म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे विद्यार्थी बारावी नंतर प्रवेश करतात ते व्यवसायिक शिक्षण क्षेत्रात. नुकत्याच विद्यार्थ्यांनी बारावीची मुख्य परीक्षा व विविध अभ्यासकांच्या प्रवेश पात्रता परीक्षा दिल्या आणि आता त्यांच्या व पालकांच्या समोर हा यक्षप्रश्न येऊन ठेपाला आहे की आता “बारावी नंतर पुढे काय ?”.
आज व्यवसाय क्षेत्रातील अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. त्यातील महत्वाच्या पर्यायांपैकी मेडिकल, प्यारा मेडिकल, इंजिनिअरिंग ,मॅनेजमेंट, कॉमर्स ,सायन्स लॉ इत्यादी व काही इतर विद्यार्थ्यांना हमखास रोजगार उपलब्ध करून देणारे पर्याय आहेत. उपलब्ध पर्यायांपैकी योग्य आणि सर्वोत्कृष्ट पर्याय निवडण्याचे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल बोलायचे झालेच तर परंपरेनुसार हा सर्वोत्तम पर्याय म्हणून ओळखला जातो. कारण परंपरेनुसार इंजिनिअरिंग सर्वाधिक रोजगार देणारी विद्याशाखा आहे, आणि भारतासारख्या डेव्हलपिंग देशात आजही स्किल इंजिनीरिंची खूप मागणी आहे. त्यातच वेगाने होणारे टेक्निकल बदल हाताळन्याकरता लागणारे मनुष्यबळ हे मोठं आव्हान सर्व उद्योगासमोर आहे. म्हणून ऍडमिशन घेताना काय काळजी घेतली पाहिजे?, हे या लेखाच्या माध्यमातुन, सांगण्याचा एक प्रयत्न आहे.
प्रामुख्याने कुठलाही पर्याय निवडताना काही विशेष बाबींकडे कडे बघितले जाते व ते म्हणजे त्या अभ्यासक्रमासाठी लागणारा कार्यकाळ, शैक्षणिक खर्च व नंतर येणारा परतावा परंतु त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे job satisfaction. अभियांत्रिकी हा एकमेव पर्याय असा आहे की ज्यामध्ये सर्व या सर्व गोष्टी पूर्ण होऊ शकतात.
विद्यार्थी बारावी विज्ञान करून अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश मिळवु शकतो. या क्षेत्रात अनेक शाखा आणि उपशाखा आहेत, सामान्यतः अभियांत्रिकी शाखांना हार्ड ब्रांच अँड सॉफ्ट ब्रांच अशा पद्धतीने विभागले जाते. सोबतच प्रत्येक शाखांमध्ये वेगळ्या प्रकारच्या जॉब प्रोफाइल उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील शाखानिवड करताना वरील सर्व बाबींचा सखोल विचार आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. जॉब प्रोफाइल सोबत येणाऱ्या वर्षात अभियांत्रिकी क्षेत्रातील लागणारे मनुष्यबळ यांचा देखील प्रामुख्याने विचार करणे गरजेचे असते.
21 वे शतक हे इतिहासत ओळखले जाईल,ते या शतकात झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे आणि त्यामुळेच आजच्या डिजिटल युगात विविध क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर अनिवार्य झालेलाआहे. कोरोना काळात virtual कनेक्टिटीव्हिटीमुळे खूप काही आव्हाने अगदी अलगदपणे पैलेली गेली .
आज जागतिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेला प्रचंड मागणी आहे .या शाखेचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करु शकतात. आजच्या अभियांत्रिकी शिक्षणास ज्ञान,आकलन,कौशल्य, आजची आणि उद्याची काळाची गरज यांची उत्तम सांगड घातली आहे. तसेच बहुतांश विद्यार्थ्यांना अकरावी व बारावी मध्ये इलेक्ट्रॉनिक्सची ओळख झालेली असतेच
मागील काही वर्षात सरकारने अनेक नव्या उपक्रमांना सुरुवात केली आहे, त्यातील महत्त्वाचे उपक्रम म्हणजे “डिजिटल इंडिया” व “मेक इन इंडिया” या उपक्रमाअंतर्गत अधिकाधिक रोजगार उपलब्धिची हमी दिली आहे. पण प्रत्यक्षात रोजगार संधी साठी योग्यतेचे मनुष्यबळ देशाकडे उपलब्ध असेल का ? हा मोठा प्रश्न आहे. कारण मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांचा कल इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक किंवा कम्युनिकेशन सारख्या क्षेत्रात कमी झालेला दिसतो.
त्यामुळे कदाचीत येणाऱ्या वर्षांमध्ये कुशल मनुष्यबळाचा या क्षेत्रात तुटवडा जाणवू शकतो, मेक इन इंडिया (मेक इन इंडिया डॉट कॉम) च्या अग्रलेखातून दिसून येते की इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम डेव्हलपमेंट या क्षेत्रात सरकारच्या नॅशनल नॉलेज नेटवर्क , नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क ,टॅबलेट फॉर एज्युकेशन सेक्टर, डिजिटायलिझशन पॉलीसी, अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून देश-विदेशातील गुंतवणूकदार आपल्या देशात प्रोजेक्ट इम्प्लिमेंटीशन साठी तयार आहेत. जवळजवळ चार हजाराहून अधिक उद्योग भारतात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून उभारायला सुरुवात करत असताना इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन क्षेत्रात कमी होणारा विद्यार्थ्यांचा कल ही एक गंभीर बाब आहे. देशात इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ची गरज विद्यार्थी तथा पालकांनी ओळखली पाहिजे. देशात इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टच्या मागणी मधील 65% उत्पादनाने बाहेरून मागावे लागतात कारण खऱ्या अर्थाने आपण इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्पादनासाठी सक्षम नाही.
विदेशी उत्पादनाचा वापर हा देशाच्या हिताचा नाही हे ओळखून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशात मेक इन इंडिया च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज डेव्हलप करण्याचा पूर्ण निर्धार करून त्यावर अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. सध्या मेक इन इंडिया च्या माध्यमातून खालील महत्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत.
1) Electronics System Design & Manufacturing (ESDM )
2) Electronics manufacturing services (EMS)
3) Electronic Manufacturing Clusters (EMC)
4) Electronics Component Industries
अनेक विदेशी उत्पादकांनी भारतात प्रकल्पाची उभारणी सुरुवात असून यात USD 10.05 Billion ची गुंतवणूक आहे. या कंपन्या सोबतच अनेक शासकीय प्रकल्प राबवण्यात येणार असून आगामी काळात देशात इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज भरपूर प्रगती करेल व तरुणांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. अशा परिस्थितीत दूरदृष्टी ठेवून पालकांनी व विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधी ओळखत पर्याय निवडणे अपेक्षित आहे. जेव्हा विद्यार्थी या शाखेचा अभ्यास करतो तेव्हा तो वेगवेगळ्या क्षेत्राला लागणारे प्रॅक्टिकल कौशल्याचे शिक्षण घेतो उदारणार्थ.
1. मेडिकल क्षेत्रात लागणारी अत्यावश्यक उपकरणे इन्स्टॉलेशन आणि दुरुस्तीसाठी या शाखेचे विद्यार्थी लागतात.
2. Embedded System मुळे इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये मोठी क्रांती होतं आहे. उदा.ऑटोमोबाईल मध्ये vehicle speed dial , Airbag System , Music system, गँस सिस्टिम अशी अनेक मा हिती व्हेईकल डॅशबोर्डवर मिळते.
3. कम्युनिकेशन म्हणजे घरातील लैंडलाइन टेलिफोन पासून सॅटेलाईट पर्यंत, मोबाईल वायरलेस सेन्सर नेटवर्क, डिफेन्स कॉम्प्लेक्स सिस्टीम डिझाईन मध्ये तसेच स्पेस रिसर्च मध्ये या विषयामुळे विद्यार्थ्यांना मागणी आहे.
4. आद्यवत पावर प्लांट डिझाईन मध्ये सोलर सिस्टिम वापर करून कंट्रोल सिस्टीम व पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या दोन विषयांत संशोधन आणि विकासाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत .
5. कॉम्प्युटर, लॅपटॉप ,मोबाईल दैनंदिन जीवनासाठी लागणारे उपकरणे निर्मिती,इंस्टॉलेशन आणि दुरुस्ती मध्ये रोजगाराच्या व उद्योजकतेच्या संधी या विदयाशाखेत उपलब्ध आहेत
6. चीप डिझाईन यासाठी vlsi Design व Electronics system design सारखे विषय या शाखेत शिकवले.
जातात, त्यासोबतच डिजिटल इमेज प्रोसेसिंग,डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग नॅनोटेकनॉलॉजि आणि
मेकॅट्रॉनिकस या विषयामध्ये अँप्लिकेशन बेस्ड प्रोजेक्ट्स तयार करुन स्वयंरोजगार निर्मिती देखील केली जाऊ शकते.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार येत्या पाच वर्षात टेलिकॉम क्षेत्राचा प्रभाव वाढत राहणार आहे आणि या क्षेत्रात दहा लाखाहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. टेलिकॉम हे विस्तृत क्षेत्र आहे,ज्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन विभाग सहभागी असल्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण इतर शाखांपेक्षा जास्त असणार आहे. टेलिकम्युनिकेशनमुळे रेल्वेचे तिकीट बुक करणे, जन्म व मृत्यु प्रमाणपत्र बनवणे, ऑनलाईन बँकिंग सेवा, ऑनलाइन तक्रार निवारण कक्ष, ऑनलाइन मार्केटिंग सारख्या पर्यायांचा वापर अनिवार्य होणार आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभाव बिग डेटा, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, कंपुटींग पॉवर, क्लाऊड कम्प्युटिंग, यामुळे लक्षणीय वाढला आहे.
सध्या देशात 5G तंत्रज्ञानाचा वापर हा फक्त कम्युनिकेशन आणि एंटरटेनमेंट पुरता नसुन आरोग्य सेवा, शिक्षण, अर्थ, उद्योग, दळणवळण आणि शेती क्षेत्रात देखील मैलाचा दगड ठरनार आहे. येत्या आर्थिक वर्षात रिटेल आणि हँडसेट विभागात 35% सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, 29 % नेटवर्क आणि आयटी विक्रेते,18% , टेलिकॉम उपकरण निर्मिती, 15%,पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या 3 %, अश्या 10 लाख नोकऱ्या उपलब्ध असतील. भारतातच नव्हे तर जगात प्रगतीपथावर झालेल्या क्रांती मागे सिंहाचा वाटा आहे तो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा . भारत सरकारने आखलेली धोरणे ही देश-विदेशात इंजिनिअरिंग क्षेत्राला पुढे नेणाऱी आहेत.
डिजिटल इंडिया स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया ई-क्रांती, ई-गव्हर्नन्स, डिजिटल स्टार्टअप अशा अनेक योजना E & TC इंजिनीअरला रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम असणार आहेत. परंतु एकंदरीत लागणारे सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे मोठे संकट आता भारतासमोर उभे आहे. येणाऱ्या वर्षात अभियांत्रिकी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन चे महत्व आणि गरज याविषयी जागरूकता असणे अत्यंत गरजेचे,आहे. या शाखेचा अभ्यासक्रम शिकल्याने विद्यार्थ्यांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे तसेच एमपीएससी युपीएससी मध्ये देखील या शाखेच्या जागा असतात. हार्डवेअर व सॉफ्टवेअर कंपन्या मध्ये नोकरीबरोबर सार्वजनिक उद्योग,सरकारी व निमसरकारी कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँका, हॉस्पिटल, अंतराळ संशोधन संस्था, मिलिट्री ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर, डी आर डी ओ, वीज कंपन्या, तसेच टेलिफोन इंडस्ट्री, सिविल एव्हीएशन, वेगवेगळ्या राज्यातील डेव्हलपमेंट सेंटर,डिफेन्स एयर इन पी एल, एअर टेली ग्राफ डिपार्टमेंट, अशा अनेक ठिकाणी या शाखेतील विद्यार्थ्यांची गरज आहे.
त्यामुळे भविष्याची गरज ओळखून आपण योग्य शाखेची निवड आत्ताच करावी व आपले भविष्य उज्वल होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करावे.
प्रा.( डॉ) दीपक पाटील
प्राचार्य , संदीप फाऊंडेशन(SIEM), नाशिक.
फोन नंबर- 9545453265
Email- dipak.patil@siem.org.in