चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बॅच १९८६-८७च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दि . १२ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला . तब्बल ३६ वर्षानंतर सर्व विद्यार्थी आपल्या गुरुजनांना भेटले . यात सर्वप्रथम शाळेची बेल देण्यात आली . मुले नेहमीप्रमाणे परिपाठ मैदानावर आली . संजय हांडगे (सर )यांनी परिपाठ घेतला.
तदनंतर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता नाठे हिने केले . विद्यार्थी मनोगतात डॉ . संजय आहेर (प्रसिध्द नवजात शिशू तज्ञ ),मुकुंद वाघ,मनोज टर्ले या सर्वानी आज जे काही आम्ही आहोत ते आपल्या गुरुजनांमुळॆच अशी कृतज्ञता गुरुजनांप्रती व्यक्त केली . गुरुजनांमध्ये वडजे सर ,वडजे मॅडम ,क्षीरसागर सर ,धोंडगे बी जे सर ,धोंडगे एस डी सर ,दरेकर सर ,परदेशी सर ,शेख सर ,उपमुख्याध्यापक त्र्यंबके सर ,सावळा सर ,कापडणीस सर ,व्ही . टी . गायकवाड सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांप्रती गौरवोद्गार काढले ,आमच्या विद्यार्थ्यांनी आभाळाएवढी उंची गाठली ,आम्ही धन्य धन्य झालो.
अध्यक्षीय भाषणात भोज सर यांनी पूर्वजांनी घालून दिलेल्या प्राचीन जीवनशैलीचे महत्व पटवून दिले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चांदोरीचे माजी सरपंच देवराम आप्पा निकम ,जगन नाठे ,माणिक गायखे ,शिवा पाटील (गडाख),संजय गायखे ,कोरडे सर, ,व्ही .एन .टर्ले सर उपस्थित होते .यावेळी 1986-87 या बॅचला साईखेडा केंद्रात दहावीला 80% गुण मिळवून पहिले आलेले व नाशिकचे प्रसिद्ध नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. संजय आहेर यांचा विशेष सत्कार आयोजकांकडून करण्यात आला. यावेळी जमलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी भरघोस आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पगारे (दरेकर),संजय हांडगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक गडाख ,सोमनाथ लोंढे ,बाळासाहेब आहेर ,शबाना मनियार (शेख),संध्या आहेर ,लक्ष्मण कोरडे ,अशोक कोकाटे ,विश्वनाथ जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन बाळासाहेब गडाख यांनी केले.