भारतातील कर्नाटक राज्यातील इतिहासामध्ये बदामी हे महत्वाचे स्थान आहे. बदामी याचे पूर्वीचे नाव वटाणा पिक म्हणून ओळखले जात असे हे सन 440 ते 757 पर्यंत बदामी तालुक्यांची अधिकृत राजधानी होती. हे अगस्त तलावाच्या बाजूला असणाऱ्या लाल वाळूच्या खडकाच्या पायथ्याशी आहे.
बदामी तालुक्याची स्थापना इस 40 मध्ये पुलकेशन यांनी केली .इस 566 पर्यंत ते तालुक्याचे प्रारंभिक शासक म्हणून ओळखले गेले आहे.बदामी ही तिन्ही बाजूने खडकाळ दगडांनी संरक्षित आहे. बदामीच्या उत्तरेकडे बावन्नकोट व दक्षिणेकडे रमणडळकोट असे जुने किल्ले आहेत.
पुलकेशिंचे पुत्र कीर्तीवर्मन यांनी 567 ते 598 मध्ये राज्य करून राज्याला बळकट केले. त्यानंतर त्यांचा भाऊ मंगेलेशा यांनी कीर्तिवर्मन चे तिन्ही मूल जे पुलकेशीन दूसरा, विष्णुवर्धन, बुद्धवर्स यांना नाबालिक ठरवत सन 598 ते 610 मधे राज्य केले व त्यावेळेस त्याने अनेक गुफा व मंदिरे बांधले. कीर्तिवर्मनचा मुलगा पुलकेशीन दूसरा याने मंगलेशा चा वध करून सन 610 ते 642 मध्ये राज्य केले व त्या काळी त्याने अनेक राजांचा पराभव करून पराक्रम गाजवला.
बदामीच्या गुफा या इसवी सन सहाव्या ते आठव्या शतका मधील आहे, पुलकेशीन दूसरा नंतर बदामीवर विजयनगरचे राजे, आदिलशाही सुलतान, निजाम, हैदर अली यांनी 1818 पर्यंत राज्य केले व त्यानंतर ब्रिटिश सरकारचा अमल होता.
इथे सर्वात जुने शिवमंदिर ज्याला मलेगीत्ति म्हणजे मळनीचे मंदिर असे म्हणतात. ते एका खडकावर उभे असून द्राविड वास्तूशैलीत बांधले आहे. त्याच्याजवळ जंबू लिंग देवालय आहे. तेथे ब्रह्मा-विष्णु-महेश यांची छोटी मंदिरे आहेत गावाजवळ एक सरोवर आहे ते भूतनाथ किंवा अगस्त्य तीर्थ म्हणून ओळखले जाते. या सरोवराजवळ लहान मोठी अनेक मंदिरे आहेत बदामी ची वैष्णव लेणी मंगलेशा राजाच्या काळात खोदली गेली.
पौराणिक कथे नुसार असे म्हटले आहे की दुष्ट असुर वतापी हा ऋषी अगस्थ्य द्वारे मारला गेला त्यामुळे या भागाला वतापी आणि अगस्ती तीर्थ असे संबोधले जाते.
पहिली लेणी –
ही दक्षिणेकडील पहाडात खोदलेली असून सर्वात जुनी आहे. त्यात शैवसंप्रदायाच्या मूर्ती आढळतात. प्रवेशाजवळ अठरा हातांचा नटराज गणपती गण व नंदी यासह खोदला असून, याशिवाय अर्धनारीश्वर, हरिहर, पार्वती, लक्ष्मी, महिषासूर्मर्दिनी, भूतगण व नृत्यांगना यांच्या मूर्ती आहेत व स्तंभावर पदके कोरली आहेत
दूसरी लेणी –
दुसऱ्या क्रमांकाची लेणी वैष्णपंथी असून त्याच्या दोन्ही बाजूस शिल्पपट्ट असून एकाबाजूस वराह अवतारातील विष्णू समुद्रातून पृथ्वी उचलत आहे व त्रिविक्रम एक पाय उचलून आकाश मोजण्यास उभा आहे असे दाखविले आहे
तीसरी लेणी –
ही लेणी गटातील सर्वात उत्कृष्ट तसेच सर्वात मोठे आहे. यामध्ये भगवान विष्णूच्या वैष्णव मंडळाच्या इतर प्रतिमांसह विखुरलेल्या आकाराच्या प्रतिमा आहेत. इतर लेण्यांप्रमाणेच यात छप्पर व खांब विविध कलाकृति नी कोरलेले आहेत.
चौथी लेणी–
या लेणीत सर्वात जास्त शिल्पाकृती असून स्तंभावर सिंहाची तीरशिल्पे आहेत एका बाजूस शेषशाही विष्णू व दुसऱ्या बाजूला त्रिविक्रम यांच्या मुर्त्या आहेत, त्रिविक्रम मूर्तीच्या पायाजवळ यांचे पूर्वीचे रूप वामन अवतार हे दाखवले आहे याशिवाय अनेक मुर्त्या कोरल्या आहेत त्याचे छत विविध नक्षीकामाने कोरलेले असून त्यात विद्याधर, नाग दांपत्य, व नागराज यांच्या सुबक मूर्ती आहेत. मुख्य मंडपाचे छतही असेच नक्षीयुक्त आहे.
कसे जाल??
बादामीला जाण्यासाठी बंगळुरुपासून 450 किमी अंतरावर आहे. हुबळी हे सर्वात जवळचे विमानतळ आहे (बदामीपासून 105 किमी). बदामी येथे एक रेल्वे स्थानक आहे. व इतर भागातून चांगली रस्ता जोड़ सुद्धा आहे.
मंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल्स, औरंगाबाद.