बांधकाम व्यवसायिकांनी वैद्यकीय सुविधा उभारावी- राजेगावकर

Advertisements

बांधकाम व्यावसायिकांची देशातील शिखर संस्था क्रेडाई नाशिक मेट्रो चा आज दिनांक 25 मे रोजी ३३ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला .त्यानिमित्ताने आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मनोहर गार्डन येथे सकाळी ९ ते दुपारी ३ दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

गेल्या तीन दशकांहून अधिक कालावधी मध्ये शहराचे लँडस्केप बदलणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांनी आगामी काळात नाशिक मध्ये वैद्यकीय सुविधा उभारणीवर लक्ष केंद्रित करावे. रस्ते ,इमारती,संपर्काचे जाळे ,गार्डन , शिक्षण ,उद्योग ,पर्यावरण या सर्व बाबी मध्ये नाशिक देशात अग्रेसर असून एक राहण्यासाठी उत्तम शहर होण्यासाठी पुरेश्या आरोग्य सुविधा देखील वाढविल्यास नाशिक चा अजून विकास होईल. – अनंत राजेगावकर (उपाध्यक्ष, क्रेडाई राष्ट्रीय )

बांधकाम व्यवसायिक हा शहर सौंदर्यकरण् या मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. याचसोबत बाहेरून अधिक उद्योग, व्यवसाय नाशिक मध्ये येण्यासाठी नाशिकच्या ब्रँडिंग चे कामही गेल्या काही वर्षांपासून क्रेडाई नियमितपणे करत आहे. 

बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र यावे या भावनेने स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या ३३ वर्षात बांधकाम क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळवून दिला असून या उद्योगाला व्यावसायिकता, तंत्र शुद्धता तसेच परंपरेला अनुसरून आधुनिकतेची जोड या त्रिसूत्री मध्ये बांधले आहे. गेल्या वर्षभरापासून भेडसावत असणाऱ्या कोविड संकटामध्ये समाजाला मदत करण्यासाठी शासन व प्रशासनाच्या आवाहनाला क्रेडाई तर्फे नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला गेला. समाजाला विविध स्तरावर आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केल्यानंतर राज्यात आदर्श ठरलेल्या कोविड केअर सेंटरची उभारणी क्रेडाई तर्फे ठक्कर डोम येथे करण्यात आली. –रवी महाजन (अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो)

सर्व सदस्यांनी शासन नियमांचे पालन करतांना सर्व कायदे पाळावे यासाठी क्रेडाई नेहमीच आग्रही राहिली आहे. काही वर्षांपूर्वी आलेला रेरा कायदा असो किंवा नुकतीच आलेली एकिकृत बांधकाम नियमावली या दोन्हीमध्ये क्रेडाईने सकारात्मक भूमिका बजावून सदस्यांच्या प्रशिक्षणावर ही जोर दिला. यासोबतच बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कुशल व अकुशल कामगारांचे देखील प्रशिक्षण हे क्रेडाई तर्फे नियमित रित्या आयोजित करण्यात येते. –जितूभाई ठक्कर (चेअरमन, क्रेडाई राष्ट्रीय घटना समिती)

क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनिल कोतवाल , माजी अध्यक्ष सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार ,किरण चव्हाण व उमेश वानखेडे यांनी ग्राहक हित व शहर विकास या विषयावर एकत्रित मार्गदर्शन केले.  या प्रसंगी मानद सचिव गौरव ठक्कर,उपाध्यक्ष नरेश कारडा, कृणाल पाटील , अनिल आहेर,सचिन बागड रक्तदान शिबिर चे समन्वयक निरंजन शाह ,तसेच मॅनेजिंग कमिटी सदस्य मनोज खीवंसरा, श्रेणिक सुराणा,राजेश आहेर ,हंसराज देशमुख ,नरेंद्र कुलकर्णी,विजय चव्हाणके ,अंजन भालोदिया, सागर शाह ,नितीन पाटील तसेच वरिष्ठ सदस्य शशी जाधव,सुजॉय गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिर जनकल्याण रक्त पेढी च्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते ..

Leave a Reply

You cannot copy content of this page