दोन समांतर नद्यांमधील हे आहे भारतातील अद्भुत द्वीप.

Advertisements

माजुली द्वीप आसाम राज्यातील जोरहाट शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये बसलेले एक मोठा नदीद्वीप आहे. 

1853 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या सर्वेनुसार ह्याचा येरीया हा 1246 वर्ग किलोमीटर इतका होता परंतु आता फक्त 421 वर्ग किलोमीटर इतका राहिला.

माजुली द्वीपच्या दक्षिणेला ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि उत्तरेला खेरकुठीया नावाच्या नद्या वाहतात. खेरखुटिया खुटी नदीही ही ब्रह्मपुत्रा पासून निघालेली आहे आणि पुढे जाऊन परत ब्रह्मपुत्रा नदीत मिळाली आहे.

माजुली या शब्दाचा अर्थ दोन समांतर नदी मधली जागा. लोक कथेनुसार 1750 साली आलेल्या महाप्रलय कारी पुर आला त्याने 15 ते 20 दिवस अहंकार माजवला ज्यामुळे ब्रह्मपुत्रा नदी दोन भागात विभागल्या गेली ज्याची मुख्य धारा उत्तरेच्या दिशेने व्हायला लागली व दुसरी धारा दिहिंग नदीच्या बरोबर दक्षिण दिशेने व्हायला लागली व त्यातच माजुली निर्माण झाले .

काही काळानंतर उत्तरेच्या दिशेने वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा

नदीच्या प्रवाहात कमी आल्याने त्याला लुहित कुटी व नंतर खेरकुठीच्या खुटी असे म्हटले गेले.माजुली दीप हे मुख्य जमिनीपासून 2-5 किलोमीटर अंतरावर आहे जेथे फक्त बोटीने जाता येते .याची लांबी पूर्वेकडून पश्चिमेकडे 45 ते 48 किलोमीटर व रुंदी उत्तरपासून दक्षिणेकडे 7 ते 8किलोमीटर आहे.

माजुली दीप हे मिसिंग व देऊरी समाजाचे लोक तसेच अन्य जातीचे लोक राहतात मिसिंग जमातीचे लोक हे मुख्यतः बर्मा (म्यानमार) देशाचे आहेत पण चांगल्या जीवन शैली साठी 700 वर्षांपूर्वी ते अरुणाचल प्रदेश मार्गे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्याने येऊन इथे वसले आहे. ही जमात विशिष्ट प्रकारचे वाद्य यंत्र संगीत नृत्य असते जे त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात वाजवतात.

आली- आय – लींगांग व पोरांग हे त्यांचे पारंपारिक सण आहे माजुली मधली दुसरी जमात देऊरी ही आहे. त्यांची लोकसंख्या फक्त ३% आहे त्यांची मुख्य संख्या ही श्रीराम देऊरी व मेजर देऊरी या दोन गावात आहे ते बीहु हा सण मानतात त्यांच्या विशिष्ट नृत्य कला व गीतांनी हुरीयारंगाली म्हणवतात.

 येथील मुख्य उद्योग शेती व्यवसाय आहे .यात ते कुठल्याही कृत्रीम पदार्थाची अथवा किटकनाशकाचा उपयोग करत नाही कोमल चावल हा सगळ्यात लोकप्रिय तांदूळ आहे. माजुली दीप आसामचा नव वैष्णव सांस्कृतिक केंद्र मानल्या जातो .

नववैष्णव विचारधारा आसामचे संत श्रीमंत शंकर देव आणि त्यांचे शिष्य माधव देव यांनी पंधराव्या शतकात सुरू केली. या महान संताद्वारे अनेक मॉनेस्ट्री ज्याला आसाम भाषेत सत्र म्हणतात. माजूली मध्ये टोटल 65 मॉनेस्ट्री स्थापन केल्या आहेत याठिकाणी आता जुन्या पद्धतीच्या आसामी कलाकृती अस्त्र-शस्त्र, भांडे, कपडे, दागिने, हस्तशिल्प बघायला मिळते. येथील मॉनेस्ट्री मध्ये महत्त्वाच्या ज्या आहेत कमलाभारी, उत्तर कमला भारी, सामागुरी, गर मूठ, अवनी आटी,बैगेना आटी, दक्षिण पाट, मॉनेस्ट्री आहेत.

नोव्हेंबर महिन्यात तीन दिवसाचा उत्सव होतो यावेळी रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात. येथील स्थानिक पदार्थ पुरंग अपान (तांदळाचा विशेष पानात बनवलेला पदार्थ) व अपोग (तांदळापासून बनवलेली बियर) असेआहेत. तसेच मुंगा रेशम ने हाताने बनवलेले शिल्प व कपडे उत्पादन बघायला व खरेदी करायला मिळते. येथील नैसर्गिक सौंदर्य व पक्षी बघायला खूप सुंदर वाटते, पक्षी प्रेमींसाठी हि खूप मोक्याची जागा आहे. इथे अनेक प्रकारचे प्रवासी पक्षी येतात या पक्षांना बघायला नोव्हेंबर ते मार्च काळ खूप चांगला असतो. 

माजुली प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे सौंदर्य बघायला मिळते, पावसाळ्यात हा भाग 50 ते 70 % पाण्याने भरतो. त्यावेळी बोटीतून हे सौंदर्य बघायला वेगळाच आनंद मिळतो व त्या वेळी इथला निसर्ग भरभरून वाहतो माजुली येथे जाण्यासाठी जोरहट पर्यंत विमानाने / रेल्वेने जाता येते व तेथून वीस किलोमीटर रोड जाऊन पुढील अंतर बोटीने जावे लागते.

सौंदर्याने नटलेले हे द्वीप नक्कीच एकदा बघावे 

मंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल औरंगाबाद

Leave a Reply

You cannot copy content of this page