कामाख्या देवीचे मंदिर हे आसाम राज्यात गुवाहाटी शहरापासून 8 km अंतरावर असलेल्या निलांचाल पर्वत श्रेणीत आहे , हे मंदिर शक्तीदेवता सतीचे हे मंदिर आहे, 51 शक्ती पिठा पैकी एक असून येथील देवी योनी स्वरूपात आहे, ह्या मंदिराला तांत्रिक व मांत्रिक शास्त्रात विशेष महत्व आहे.
पौराणिक इतिहास
सतीचे वडील दक्ष राजाने खूप महत्वाचा यज्ञ केला , त्या एडन कार्यासाठी सामील होण्याचे आमंत्रण त्यांनी भगवान शंकरांना पाठवले नाही , तरीही देवी सती या यज्ञ कार्यात सामील झाल्या , त्या वरून दक्ष राजाने देवी सती व भगवान शंकराचा खूप मोठा अपमान केला , तो अपमान सहन न झाल्याने देवी सतीने स्वतः ला शिक्षा म्हणून यज्ञाच्या जळत्या अग्नी कुंडात उडी घेतली, ज्या वेळी ही बाब भगवान शंकराला कळाली ते अत्यंत क्रोधीत झाले व अग्निकुंडातून देवी सतीचे शरीर बाहेर काढले व खांद्यावर उचलून इकडे तिकडे भटकायला लागले , त्या वेळी देवी सतीचे शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी शक्ती पीठे निर्माण झाली , कामख्य शक्ती पीठ येथे सतीच्या शरीराचा योनी अंग पडला , या मुळे या शक्ती पिठा मध्ये माताच्या योनीची पूजा होते .
बांधकाम
या मंदिराचे बांधकाम व नूतनीकरण 8 व्या ते 17 व्या शतका मध्ये झाले , मंदिरात 4 भाग आहेत 1 गर्भगृह व 4 मंडप आहेत ज्याला कालांत, पंचरत्न , व नात मंदिर म्हणतात , ते पूर्वे कडून पश्चिमेकडे सरळ रेषेत आहे .गर्भगृह हे पंचरत्न योजना प्रमाणे बांधले आहे, जो तेजपुर मधील सूर्य मंदिराच्या धर्तीवर आहे, मुख्य भागावर खजुराहो पद्धतीचे नक्षीकाम आहे, मधल्या खांबावर गंशजी व अनेक देवी देवतांचे शिल्प आहे, खालचा भाग दगडांनी बांधला आहे, मधमाशा सारखे घुमट विटांनी बांधले आहे, हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे , गर्जना गृहातील अंतर्गत गर्भाशय भूगर्भातील पातळीच्या खाली आहे.
कामरूपच्या नंतरचे पाल , इंद्रपाल ते धर्मपाल पर्यंत तांत्रिक तत्वाचे अनुयायी होते , त्या काळात कामख्य तांत्रिक धर्माचे महत्वपूर्ण स्थान बनले होते , कालिका पुराण तयार केले गेले आणि कामख्य तांत्रिक बलिदानाचे गुढवाद आणि जादूचे एक प्रसिद्ध केंद्र बनले ,
असुरराज नरकासुर अहंकारी होता, भगवती कामख्य ला आपली पत्नी करून घेण्याची इच्छा होती ,त्या साठी आग्रही होता, नरकासुराचा मृत्यू जवळ आला होता हे ओळखून देवीने त्याला सांगितले की आज एक रात्रीत तू निल पर्वताच्या चारही बाजूना 4 रस्ते तयार कर आणि मंदिरासोबत एक विश्राम गृह ही तयार कर , तू हे पूर्ण करू शकल्यास मी तुझी पत्नी होईल आणि नाही करू शकल्यास तुझा मृत्यू अटळ आहे, अहंकारी राक्षसाने सकाळ होण्यापूर्वी दगडाच्या पायऱ्याचे 4 रस्ते तयार केले पण विश्राम गृहाचे काम चालू असताना देवीने एक मायावी कोंबड्या द्वारे सकाळ झाल्याचे सूचित केले, ज्या मुळे रागावलेल्या नारकसुराने त्याचा पाठलाग केला , ब्राम्हपुत्राच्या दुसऱ्या तीरावर पोहचलेल्या असुराने त्या कोंबड्याला मारले , ते ठिकाण आजही कुक्ताचीक नावाने प्रसिद्ध आहे, नंतर देवी भगवतीच्या माये मुले भगवान विष्णू ने नरकासुराचा वध केला, त्याच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा भगदत्त कामरूपच्या राजा झाला .
नारकसुराच्या हीन कार्या मुळे व तसेच मुनींच्या अभिशाप मुळे देवीला प्रकट व्हावे लागले
आद्य शक्ती कामख्य देवीचे दर्शन घेण्या पूर्वी महाभैरव उमानदाचे दर्शन घेतात , हे मंदिर गुवाहाटी शहरा जवळ ब्रम्हपुत्रा नदीच्या वरच्या भागाला आहे, हे ठिकाण तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्ती पीठ आहे , या ठिकाणाला मध्यांचाल पर्वत या नावाने ओळखले जाते , करण या ठिकाणी समाधिस्त असलेल्या शंकरांना कामदेवा ने बाण मारला होता आणि समधीतून बाहेर आल्यावर भगवान शंकरांनी कामदेवला जाळले होते , निलांचाल पर्वतावर कामदेवला पुन्हा जीवदान मिळाले होते , म्हणून या क्षेत्राला कामरूप असे म्हटले जाते
वर्षात एकदाच येणारे अंबुवाची पर्व जगातील सर्व तांत्रिक, मांत्रिक व सिद्ध पुरुषानं साठी वास्तुतः एक वरदान आहे, हे अंबुवाची पर्व देवी भगवती ( सती ) रजस्वला पर्व असते , सत्य युगात हे पर्व 16 वर्षातून एकदा , द्वापार युगात 12 वर्षातून एकदा , त्रेता युगात 7 वर्षातून एकदा , तर काली युगात प्रत्येक वर्षी जून महिन्यात येते ,
अंबुवाची पर्व काळात देवी रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतुन सलग 3 दिवस जल प्रवाहाच्या ठिकाणच्या जागी रक्त वाहते , या पर्व काळात देवीची गर्भगृहाची दाते आपोआप बंद होतात आणि तिचे दर्शन निषिद्ध होते .
पर्वाच्या काळात तिच्या योनी महामुद्रेवर पांढरे शुभ्र वस्त्र घातले जाते , जे लाल रंगाचे होते , मंदिरातील पुरोहित या वस्त्राचे तुकडे भाविकांना प्रसाद म्हणून देतात. ज्या प्रमाणे कुंभ मेळ्याचे महत्व आहे त्याच प्रमाणे आदिशक्तीच्या अंबुवाची पर्वाचे महत्व आहे .
तंत्र आणि मंत्र शास्राचे उपासक या काळात मंत्राचे पुरश्चरण , अनुष्ठान करतात , जगभरातील तांत्रिक, मांत्रिक, उपासक सिद्धी प्राप्त करण्यासाठी तसेच मंत्र साधना करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात ,
देवीच्या रजस्वला काळाची सांगता 3 दिवसांनी होते, त्या नंतर तिची विशेष पूजा आणि साधना केली जाते .
कुमारी तीर्थ
सती स्वरूप आद्यशक्ती महाभैरवी कामख्य तीर्थ हे जगातील सर्वोच्च कुमारी तीर्थ म्हणूनही ओळखले जाते , त्या मुळे या ठिकाणी कुमारी पूजनाचे अनुष्ठान महत्त्वाचे मानले जाते , सर्व कुलातील व वर्णातील कुमारिका आदिशक्तीचे प्रतीक मानल्या जातात, या मध्ये जातीभेद पाळला जात नाही , असा भेद पाळल्यास साधकाची सिद्धी नाहीशी होते ,असे मानल्या जाते , या ठिकाणी कामाख्या कुमारी रुपात स्थापित आहे असे मानले जाते .
गुवाहाटी येथे विमान , रेल्वे, व रस्त्याने सहज पोहचता येते. गुवाहाटी जवळ अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत .
मंगेश कपोते हेरंब ट्रॅव्हल , औरंगाबाद