बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बी ए आय) च्या नाशिक शाखेद्वारे खा. हेमंत गोडसे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातील गिरणारे व सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात स्वयम् ऑक्सीजन युनिट उभारण्यात आले असून त्यापैकी गिरणारे येथील प्लांट चे त्याचे लोकार्पण आज करण्यात आले असून सिन्नर येथील प्लांट आगामी तीन दिवसात कार्यरत होणार आहे.
या स्वयम् ऑक्सिजन युनिट तर्फे गिरणारे येथे प्रति तास ५ एन एम क्यू व सिन्नर येथे १० एन एम क्यू ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अभय चोकसी यांनी दिली.बिल्डरस असोसिएशन ही देशभरातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात जुनी संस्था असून करोना संकट काळात सामाजिक दायित्व म्हणून ती नागरिकांच्या मदतीस धावून आली आहे.उभारण्यात आलेल्या या दोन्ही ऑक्सिजन निर्मिती प्लांटची एकूण किंमत सुमारे 36 लाख असून प्लांट सोबत अखंड वीज पुरवठ्यासाठी जनरेटर देखील संस्थेतर्फे देण्यात आला आहे.सदर उपक्रमामध्ये सचिव विजय बाविस्कर, उपाध्यक्ष मनोज खांडेकर तसेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, तसेच .एम ए टी पाटील बिल्डर्स अँड कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि.,बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि.,आकार कन्स्ट्रक्शन,बी.पी. सांगळे कन्स्ट्रक्शन प्रा. लि.,गजानन कन्स्ट्रक्शन,जमुना इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.,ए. एस. सोनजे असोसिएट्स,एन. के. वर्मा,आनंद कन्स्टुवेल प्रा. लि.एफ. सी. राॅड्रीग्स,एस. बी. देशमुख,बी. एस. चोप्राएन. एम. पेखळे इन्फ्रा प्रा. लि.विनोद लुथरा,पवार पाटकर कन्स्ट्रक्शन प्रा. लि., रामकमल बिल्डकॅान प्रा.ली., विशाल कन्सट्रक्श्न्स, शिवाजी धुगे ई सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग आहे.
