लसणाचे हे आहेत फायदे- जाणून आश्चर्यचकित व्हाल.!

Advertisements

आपल्या जेवणात लसणाचा तडका अवश्य लावा, कारण आपल्या आतड्यांमध्ये होणाऱ्या जीवघेण्या संसर्गापासून त्यामुळे तुम्ही वाचू शकता. 

एका अभ्यासात याचा खुलासा झालाय. लसणात अनेक औषधी गुणधर्म आहेत. बाराही महिने लसूण खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं मानलं जातं. विशेष करून हिवाळ्यात लसूण खूप उपयुक्त ठरतं. काही लोकांना लसणाचा स्वाद आवडत नाही. मात्र जर आपण लसणाची एक कळी रोज खाल्ली तर त्याचा शरीराला फायदाच होईल.

लसूण फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर अनेक रोगांपासून तुम्हाला दूर ठेवतो. लसणात अशी काही अँटी बॅक्टेरिअल तत्व आहेत जे आपल्या शरीराला बॅक्टेरिअल संक्रमणापासून वाचवण्यात मदत करतात. लसूण शरीरातील रक्त पातळ करण्यात मदत करतं आणि शरीरात रक्ताच्या गाठी (क्लॉट्स) बनू देत नाहीत. 

लसणाचे आणखी काही फायदे –

1. लसणाचे सेवन गुडघेदुखीपासून आराम देतं. 

2. लसणामुळे त्वचा चमकते.

3. लसणामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. 

4. लसणात अँटी बॅक्टेरिअल तत्त्व असतात, ज्यामुळे श्वासासंबंधी रोगांपासून दिलासा मिळतो. 

5. लसणाच्या सेवनामुळं बद्धकोष्ठतेत आराम मिळतो आणि अॅसिडिटीच्या समस्येपासूनही सुटका होते.

6. लसणाच्या दोन-तीन कळ्या कुटून त्यात लवंगीचं तेल आणि सहद मिसळून चाटण घेतल्यानं कफ निघून जातो.

डॉ. प्रवीण केंगे

अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल

राणे नगर-9270433863 गंगापूर रोड-9130973950 नाशिक रोड-9075033863 निफाड-7057405962

Leave a Reply

You cannot copy content of this page