सुटलेले पोट कमी करायचे?? यांचे करा सेवन ..

Advertisements

आपल्या घरात सहजगत्या मिळणाऱ्या या पदार्थ्यांचे सेवन केल्याने वजन कमी करता येऊ शकते.

दही :

रोजच्या आहारात वापरल्या जाण्याऱ्या दह्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणावर आढळून येते यामध्ये असणारे कॅल्शिअम फॅट्स वाढवणारे हार्मोन्स संतुलित ठेवते त्यामुळे सुटलेल्या पोटावर नियंत्रण आणण्यासाठी ‘दही’ हा उत्तम उपाय आहे.

टॉमेटो :

टॉमेटोचे सूप किंवा सॅलेड सुटलेले पोट नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. टॉमेटोमध्ये फॅट्स कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात.

बडीशेप :

जेवणानंतर रोज एक चमचा बडीशेप खाणे फायद्याचे ठरते. बडीशेपेमध्ये फायबर, आयर्न, मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात असते त्याचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यास होतो.

सोयाबिन :

आपल्या आहारामध्ये सोयाबिनचा वापर करणे उपयुक्त असते सोयाबिनमध्ये असणारे घटकांमुळे अतिरीक्त भूक नियंत्रणात येते.

लसूण :

रोज सकाळी 4-5 कच्च्या लसणीच्या पाकळ्या खाव्यात त्यावर एक ग्लास पाणी प्यावे यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते.

मासे :

मासे खाल्याने शरीररातीलातील फॅट्स कमी होतात असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही परंतू हे खरे आहे माशांमध्ये ओमेगा 3 आणि प्रोटीन असते त्यामुळे भूक संतुलित राखण्यास मदत होते. माशांचा उपयोग आठवड्यातून एकदा आहारात नक्की करावा.

काकडी :

रोज जेवणाआधी आहारामध्ये काकडीचा सामावेश करावा काकडीमध्ये फायबर, मिनरल, व्हीटॉमिन आणि पाणी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शरीरांतील टॉक्सिन्स् बाहेर पडायला मदत होते.

अननस :

अननसामध्ये अत्यंत गुणकारी घटक असतात अननसातील या घटकांमध्ये पोट कमी होण्यास मदत होते.

दूध :

एका सर्वेक्षणानुसार असे आढळून येते की दूधामधील कॅल्शिअम शरीरातील फॅट्स कमी करण्यास उपयुक्त ठरते त्यामुळे रोज रात्री एक ग्लास दूध पिणे फायद्याचे ठरते.

अळशी :

अळशी ह्या घटकामध्ये आयर्न तसेच ओमेगा 3 आढऴून येते अळशी खाल्ल्यामुळे पोट कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर मधूमेह, अल्जायमर आणि कॅन्सरचा होण्याचा धोकाही कमी होतो. रोज एक चमचा अळशी किंवा अळशीची चटणी खाणे फायद्याचे ठरते.

या घटकांमुळे आपले आरोग्य संतुलित राखण्यास मदत होईल, तसेच वजनही आटोक्यात राखता येईल.

डॉ. प्रवीण केंगे

अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल

राणे नगर-9270433863 गंगापूर रोड-9130973950 नाशिक रोड-9075033863 निफाड-7057405962

Leave a Reply

You cannot copy content of this page