सिमेंट व स्टीलमध्ये होणारी अवाजवी दरवाढ रोखण्यासाठी व सिमेंट व स्टील कंपन्यांवर रेग्युलेटरी ऑथॉ रीटी सरकारने नेमावी या मागणीसाठी सर्व बिल्डर्स व बांधकाम कॉन्ट्रॅक्टर्स देशव्यापी संप करणार आहे .या संपाची हाक बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या देशपातळीवरील संस्थेने व इतर बांधकाम व्यावसायिक संघटनांनी दिली आहे.
बांधकामासाठी लागणाऱ्या स्टील व सिमेंटच्या दरात गेल्या तीन महिन्यात सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे व त्यामुळे बांधकामाच्या दरांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झालेली आहे . त्यामुळे सामान्यांना घरे परवडेनाशी झाली आहेत. सरकारी कामे व इन्फ्रास्ट्रक्चरची कामे यांना मोठा फटका बसणार आहे.
या गोष्टींच्या मागणीसाठी व निषेधासाठी पूर्ण नाशिक जिल्ह्यातील बांधकामे बंद ठेवण्यात येणार आहेत व मा. जिल्हाधिकारी नाशिक यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया,नाशिक सेंटर तर्फे निवेदन देण्यात येणार आहे असे नाशिक अध्यक्ष राहुल सुर्यवंशी व माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.