महिलांमधे संधीवाताचे वाढते प्रमाण चिंताजनक- कृती करणे, तुमच्या हातात

Advertisements

खरे तर आर्थरायटिसचे अनेक प्रकार असतात, त्यात सर्वात जास्तं आढळणारा प्रकार म्हणजेच “ऑस्टीओआर्थरायटिस”, ज्याला आपण सोप्या भाषेत संधिवात असे म्हणतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील सहापैकी एकाला संधिवाताचा त्रास होतो. आधी हा आजार महिलांनाच होतो असे मानले जात होते, पण पुरुषांनाही हा आजार होतो हे स्पष्ट झाले आहे. 

नैसर्गिकरित्या स्त्रियांना संधीवाताच्या जोखीम घटकांचा तिहेरी धोका असतो; जैविक, अनुवांशिक आणि हार्मोनल. दुर्दैवाने यात चौथ्या घटकाची भर पडली आहे आणि तो म्हणजे  लठ्ठपणा. एकंदरीत, स्त्रियांमधे वाताचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे संधीवात हा पुरुषांच्या तुलनेत अधिक व्यापक असतो.

भारतात सरासरी 18.5 कोटी लोकांना संधीवात


तज्ञांचा असा अंदाज आहे की भारतात सरासरी 18.5 कोटी लोकांना संधीवात आहे आणि त्यापैकी 60% ह्या स्त्रिया आहेत. वय वर्षे55 च्या आधी पुरुषांमध्ये ह्या आजाराची संभावना अधिक असते आणि 55 वर्षा नंतर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या पेक्षा अधिक होते.पुरुषांना संधीवताचा त्रास खुब्यांमधे अधिक होतो आणि स्त्रियांच्या गुडघे आणि हातांवर याचा अधिक परिणाम होतो.

 हे भेद असण्याचे काही महत्त्वाचे कारण आहे :

1. जैविक
महिलांचे शरीराची रचना ही मुलांना जन्म देण्यासाठी घडवलेली असते, अर्थात त्यांच्या शरीराच्या खालच्या भागातील टेंडन हे पुरुषांच्या तुलनेत अधिक लवचिक असतात.परिणामी सांधे थोड्या ठिकाणी अधिक फिरतात. जेव्हा सांधे कमी स्थिर असतात तेव्हा दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तसेच महिलांचे खूबे हे गुडघ्यांच्या तुलनेत अधिक रुंद असतात आणि त्यांचे गुडघे पुरुषांसारखे सरळ नसतात. महिलांची ही शरीर रचना बघता लक्षात येते की त्यांना गुडघ्याच्या दुखापतीचा अधिक धोका असतो परिणामी संधीवताचा त्रास संभवतो.


2. अनुवंशिकता: 
कुटुंबात संधीवताचे चलन असेल तर महिलांमधे त्याचे अनुवांशिक संबंध दिसतात. वैद्यकीय तपासण्यांमध्ये असे दिसून आले आहे की ज्या स्त्रीच्या आईला संधीवताचा त्रास झाला आहे, त्या स्त्रीला देखील तिच्या आई प्रमाणे त्याच सांध्यांचा संधीवात होतो. 3. हार्मोन्स: 
संशोधकांचा असा विश्वास आहे की स्त्रियांमधील हॉर्मोन हे सांध्याच्या दोन्ही हाडांच्या मधातील कार्टीलेजवर परिणाम करते. हे कार्टीलेज सांध्याची हालचाल करण्यासाठी ताखात्यासारखे काम करते. रजोनिवृत्ती नंतर महिलांमध्ये ईस्ट्रॉजनचे प्रमाण कमी होते आणि संधीवात होण्याचे प्रमाण वाढते, अश्यावेळी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी लागते. 

4. लठ्ठपणा
आकडेवारी सांगते की पुरुषांच्या तुलनेत महिलांमधे लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असते आणि हाच लठ्ठपणा संधीवताचे कारण ठरतो. अत्याधिक वजनामुळे सांध्यांवर अधिक ताण येतो आणि कार्टीलेजची झीज लवकर होते.

सांधेरोपण हा एक पर्याय 

शारीरिक रित्या सक्रिय नसल्याने  औषध उपचार , वजन कमी करून आणि भौतिक उपचार वापरून जर संधीवात कमी झाला नाही आणि दुखणे थांबले नाही तर सांधेरोपण (शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम सांधे बसवणे) हाच पर्याय असतो आणि तांत्रिक प्रगतीमुळे ते आज वेदना सहन करण्यापेक्षा अधिक सुखकर झाले आहे.
सांधेरोपणाविषयी समाजात बर्‍याच गैरसमजुती आहेत, काही सामान्य प्रश्नाची उत्तरे  खाली देण्याचा प्रयत्न केला आहे : 


१.सांधेरोपणाने माझे आधीचे सुखकर आयुष्य परत मिळेल का? नातवंडांना प्रेमाने उचलणे असो, योगा करणे, पायऱ्या चढणे,मांडी घालून बसणे किंवा बागेत फिरायला जाणे, ही सर्व कामे  सांधेरोपणानंतर सहज करू शकतात. या साठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे जेणेकरून तुमचे वय, वजन,कार्यशैलीचा आढावा घेऊन सांधेरोपण केले जाते. 

२.महिला आणि सांधेरोपण : माझ्यासाठी हे किती योग्य आहे? सांधेरोपणामुळे  कायमच्या सांधेदुखीतून सुटका मिळू शकते आणि तुम्ही तुमचे आयुष्य पूर्ववत जगू शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिला सांधेरोपणाला लवकर सामोरे जात नाही.  सांधेरोपणाचे निदान जर लवकर झाले तर त्याच्या उपचारातून सकारात्मक परिणाम मिळतात.  उपचार घेण्यात उशीर न करता  सांधे दुखत असतील तर अस्थीरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. 

३.महिला सांधेरोपण करून घेण्यात उशीर का करतात? उशीर करण्याची काही कारणे आहेत जसे की बऱ्याच महिलांना भीती असते की शस्त्रक्रियेनंतर त्यांना आधी सारखे पारिवारिक जीवन जगता येईल की नाही. त्यांना शस्त्रक्रियेबद्दल फारशी माहिती नसते आणि त्या पुरेशी माहिती शोधत असतात. कुटुंबाची काळजी असणे योग्य आहे पण शस्त्रक्रियेला उशीर केल्यास जीवनाचा दर्जा खालावतो. जर संधीवात असेल तर  गुडघे आणि खूबे तुमचे वजन पेलू शकत नाही जेणेकरून  वेदना होतात. संधीवातामुळे तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहतात आणि तुम्हाला दैनंदिन आयुष्यातील कामे करण्यात सुद्धा त्रास होतो जसे की चालणे, मांडी घालून बसने, पायऱ्या चढणे इत्यादी. सांधेरोपणामुळे वेदना नाहीश्या होतात आणि सांध्याची हालचाल वाढते किंबहुना तुमचे सांधे पूर्ण नव्यासारखे होतात. 

४.सांधेरोपण माझे आयुष्य वाढवू शकते का ? संधीवताने त्रासलेल्या वृद्ध व्यक्तीच्या बैठी जीवनशैलीमुळे हृदयरोगाची संभावना वाढते. तथापी सामान्य शारीरिक हालचाली जसे की काही पाऊल चालल्यामुळे सुद्धा फिटनेस सुधारू शकते आणि हृदयरोगाची संभावना कमी होते. तज्ञ सांगतात की संधीवात आणि हृदयरोगाचा सरळ संबंध आहे, सांधेरोपण तुमच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारून तुम्हाला दर्जेदार जीवन देते.
संधीवाताशी झुंझत राहून आयुष्य अंधारात घालवण्यापेक्षा “सांधेरोपण” निवडा आणि सुखी आयुष्य जगा.

Leave a Reply

You cannot copy content of this page