बांधकाम क्षेत्रात गेल्या ६ दशकापासून कार्यरत ए.सी. जैन बिल्डर्स व डेव्हलपर्स तर्फे नाशिक शहरातील देवळाली जवळील विहितगाव मध्ये कमीतकमी १०० वर्षे टिकणाऱ्या परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प अर्पण हौसिंग साकारत आहे. २.७५ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात साकारत असलेल्या या गृह प्रकल्पामध्ये फक्त २५ लाखात [सर्व खर्चासहित] २बीएचके सदनिका मिळणार असल्याची माहिती संचालक अभय जैन यांनी दिली. प्रकल्पाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असून येणाऱ्या फक्त तीन महिन्यातच सदनिकांचा ताबा देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी संगितले . त्यामुळे बुकिंग केल्यानंतर ताबा मिळण्यासाठी दीर्घकाळ वाट बघण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी नमूद केले
गेल्या ६० वर्षात ए.सी. जैन बिल्डर्स व डेव्हलपर्स तर्फे शहरातील अनेक नामांकित गृहप्रकल्पाचे निर्माण केले असून शेकडो सुखी व समाधानी परिवार त्यात वास्तव्य करत आहेत.
आमचे एवढ्या वर्षातील सर्व प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशी घरे या क्षेत्रात यावे असे वाटत होते . पण ही परवडणारी घरे बांधताना बांधकामाचा दर्जा , सुविधा तसेच गुणवत्ता यात मात्र कोणतीच तडजोड करायची नव्हती त्यामुळे आपला इतक्या वर्षातील अनुभव पणाला लावून या प्रकल्पाचे नियोजन केले व यामुळेच अवघ्या 25 लाखात २बीएचके सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे .या किमतीमध्ये सर्व खर्च समाविष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या वैशिस्ठ्या बाबत सांगताना ते म्हणाले की या प्रकल्पामध्ये विटांचे बांधकाम न करता पूर्ण भिंती या जगतविख्यात मिवान तंत्रज्ञानाद्वारे सिमेंट काँक्रीट ने उभारल्या असून या तंत्रज्ञानमुळे या सदनिकांचे आयुष्य हे कमीतकमी १०० वर्ष असते. या तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे भिंतीस तडे जात नसल्यासे इमारतीस फारसा मेंटेनन्स नसतो . या शिवाय या इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत. या तंत्रज्ञानाने बांधण्यात येणारा नाशिक रोड भागातील हा पहिलाच प्रकल्प आहे.
अभय जैन
निसर्गाचे वरदान, आल्हाददायक हवामान लाभलेल्या देवळाली जवळील विहितगाव येथिल अर्पण हाऊसिंग मध्ये एकूण 336 सदनिकां असून बांधकामाच्या उत्तम दर्जा सोबतच २५ पेक्षा अधिक अमिनितीज देखील देण्यात आल्या आहेत . यातील प्रमुख सुविधांमध्ये बाल्कनीसाठी फ्रेंच डोअर, व्हीट्रिफाइड टाइल्स, उच्च दर्जाचे प्लंबिंग, मुबलक पार्किंग, बॅटरी बॅकअप सहित लिफ्ट, गार्डन, सिक्युरिटी, गणेश मंदिर, सीसीटीव्ही, क्रिकेट साठी टर्फ, ग्रीन जिम, कम्युनिटी हॉल, सेन्ड पीट या प्रमुख आहेत.
या सर्व उच्च प्रतीच्या सुविधा त्यादेखील परवडणाऱ्या दरात अर्पण हाऊसिंग येथे मिळणार असून प्रकल्प रेरा नोंदणीकृत असून सर्व गृह कर्ज देणाऱ्या संस्थांतर्फे मान्यता कृत आहे.