कोपरगावातील समता पतसंस्थेच्या संस्थापक व व्यवस्थापकावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल!

Advertisements

कोपरगाव शहरातील समता नागरी सह पतसंस्था संस्थापकावर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात संस्थापकास मदत करणाऱ्या संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की  नाशिकच्या मे एस . व्हि. ठोंबरे अँड असोसिएट्स  चे एस व्ही ठोंबरे यांना  शिर्डी येथे गृह प्रकल्पासाठी व्यावसायिक प्लॉट आवश्यक असल्यामुळे त्यांचा संपर्क प्रशांत दाकले कन्सल्टन्सी सेवा असल्यामुळे झाला .  सचिन  भट्टड हे समता नागरी सह पतसंस्था कोपरगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यामुळे त्यांची ओळख पुढील कामासाठी झाली . त्यांनी रुई ता. राहता येथे गट नंबर 401 मध्ये १ हेक्टर 17 आर जमीन उपलब्ध असून त्या बाबतीत सहा कोटी 25 लाख रुपये किंमत ठरवण्यात आली व त्यासाठी 29 ऑक्टोबर 2013 मध्ये नोटराईज ईसार पावती १,२३,७५,००० नगदी देऊन करण्यात आली आहे व राहिलेली रक्कम ५,०१,२५,००० नोंदणीच्या वेळ देण्याचे ठरविले.

समता नागरी सह पतसंस्था यांची भूमिका संशयास्पद

प्रशांत डाकले व सचिन  भट्टड यांनी समता नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष दादा कोयटे यांच्याशी ओळख करून दिली व त्यांनी पुढील व्यवसायासाठी पतपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रशांत  डाकले यांनी जमीन गहाण खत करून बँकेकडे ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कर्जदार व जमीन मालक प्रशांत  डाकले यांच्या नावाने एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले वास्तविक पाहता सदरील मिळकत प्रशांत  डाकले यांनी स्वतः संस्थेकडे अगोदरच गहाण खत करून त्यावर कर्ज काढले होते व पतसंस्थेला याची पूर्ण कल्पना असताना देखील फसविण्याच्या उद्देशाने त्यांनी हा व्यवहार केला. तसेच तक्रारदार एस व्ही ठोंबरे यांचा नाशिक येथील प्रकल्प चे गहाण खत करून तोही दोन  कोटी कर्जाच्या वसुलीसाठी जप्त करण्यात आला व अडवणूक करण्यात आली. त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले .

जमिनीवर आधीच आयकर खात्यातर्फे जप्ती आदेश

ज्यावेळेस तक्रारदार हे जमिनीच्या ७/१२ व इतर कागदपत्र मागण्यासाठी तलाठी व तहसिलदार यांच्याकडे संपर्क केला असता सदरील जमिनीवर आयकर विभागाने ०३.०८.२०१७ रोजी जप्तीचे आदेश बजावली असल्याचे पत्र निदर्शनास आले.

पतसंस्थेचे थकबाकीदार यांना वाचविण्यासाठी श्रीपाद ठोंबरे यांना दोन कोटीचे कर्ज मंजूर करून ते परस्पर डाकले यांच्याकडे हस्तांतर करण्यात आले . तसेच तक्रारदारकडून ३,६५,००,००० चा भरणा करून घेण्यात आला. वरील सर्व व्यवहार झाल्यानंतर डाकले यांनी नोंदणीकृत खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली. तसेच पतसंस्थेने तक्रार दारावर वसुलीच्या बाबतीत कार्यवाही सुरू केली तेव्हा नियोजितपणे फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीसातर्फे गुन्हा दाखल

नंतर तक्रारदाराने पोलीस निरीक्षक, शिर्डी पोलीस स्टेशन यांच्याकडे फसवणूकी बाबत तक्रार दाखल केली मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे पोलीस अधीक्षक नगर याकडेही तक्रार केली शेवटी कार्यवाही न झाल्यामुळे प्रथमवर्ग न्यायाधीश राहता यांच्या कोर्टात तक्रार क्रमांक ५२९/२०१९ दाखल करण्यात आले. मा. न्यायालयाने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून प्रथम दर्शनी कर्जदारांची खोटे दस्तावेज करून व फसवणुकीच्या दृष्टीने तारण व जप्त मालमत्ता खरेदी करण्यासाठी भाग पाडून संगनमताने फसवणूक केल्याचे सिद्ध होत असल्याने फौजदारी संहीता १५६(३) नुसार पोलीस स्टेशन शिर्डी यांना तपास करून त्याचा अहवाल दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.

अखेर १४ ऑक्टो रोजी गुन्हा दाखल     याप्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादा कोयटे, श्री प्रशांत डाकले, व्यवस्थापक श्री सचिन भट्टड यांच्यावर दिनांक १४.१०.२००० रोजी गुन्हा क्रमांक ६९४/२०२० भा. द. वि. ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ४७२  व १२० (ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे व या प्रकरणांमध्ये पोलीस निरीक्षक तपास करत आहेत या प्रकरणात तक्रारदारा तर्फे  अँड चंद्रकांत ठोंबरे उच्च न्यायालय , औरंगाबाद व अँड डी के घनवटे काम पाहत आहेत

Leave a Reply

You cannot copy content of this page