माणूस मानसिक रित्या भक्कम असेल तर तो कुठल्याही परिस्थीवर नक्कीच करू शकतो . त्या करिता मात्र आजूबाजूचं वातावरण सकारत्मक हवं. हेच वातावरण उत्तम विचारांनी सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आकाशवाणी नाशिक केंद्रावरआपल्या उत्कृष्ठ भारदस्त आवाजात निवेदन करणाऱ्या श्री. जयंत ठोमरे यांनी . आपल्या रेडिओ जयंत या यू -ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून.
२६ एप्रिल २०२० ला अक्षय्य तृतीयेला रेडिओ जयंत या यू -ट्यूब चॅनेल चा शुभारंभ झाला . आनंदी कट्टा या कार्यक्रमातून उत्तमोत्तम पॉझिटिव्ह विचार मांडले जाऊ लागले आणि शुभारंभापासून आतापर्यंत १५०च्या वर आनंदी कट्टा चे एपिसोडस प्रसारित करण्यात आले आणि त्यातल्या प्रत्येकाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला .
आकाशवाणी निवेदक ते व्यवसायिक
‘ ऍड युअर प्रॉडक्ट टू ऍड युअर इमेज ‘ हे ब्रीद असणारा इंदिरा नगर नाशिक इथे गेल्या २५ वर्षांपासून अनेक उद्योजक व्यावसायिकांची खऱ्या अर्थाने उत्तम इमेज बिल्ड करणारा २५ वर्षांपासून नाशिक आकाशवाणीवर उत्तम आवाजाचे निवेदक म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जयंत ठोमरे यांचा इमेज ऍड डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ . आणि ऑल इंडिया रेडिओ ची अधिकृत जाहिरात एजन्सी…
जयंत ठोमरे यांचा प्रवास.
आकाशवाणी नाशिक केंद्र , इमेज ऍड स्टुडिओ आणि एजन्सी च्या माध्यमातून जयंत ठोमरे यांनी आतापर्यंत १०,००० च्या वर जाहीराती, ३,५०० च्या वर महितीपटना व्हॉईस ओव्हर वर ४,५०० संहिता लेखन केलयं. तसेच अनेक उत्तम जाहिराती आणि डॉक्युमेंट्रीज देखील देखील तयार करून . या जाहिरात एजन्सी च्या माध्यमातून आवाजाच्या तसेच जाहिरात आणि डॉक्युमेंट्रीज क्षेत्रात इमेज ऍड ने आपला वेगळा ठसा उमटवला यातूनच असंख्य चाहत्यांचं प्रेम मिळालं. उत्तम ध्वनिमुद्रण ,संकलन ,संहिता लेखन आणि मान्यता प्राप्त आवाजांची बँक अर्थात व्हॉइस बँक ‘इमेज ऍड’ उपलब्ध आहे .
२०२० हे साल संपूर्ण जगासाठी जणू विनाशकारी वादळ होऊन आलं आणि संपूर्ण जगाला हादरवणारं ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही .. कारण कोरोना व्हायरस या एका अगदी न दिसणाऱ्या तरीसुद्धा वेगाने पसरून संपूर्ण मानवजातीला धोका उत्पन्न करणाऱ्या विषाणूने साऱ्या जगाला जेरीस आणलं. २३ मार्च पासून आपल्या भारतात सक्तीचं लॉक डाऊन सुरु झालं .माणसं माणसानंच घाबरू लागली ,सगळीच आपापल्या घरात घाबरून राहू लागली . स्वतःची ,स्वतःच्या घरातील माणसांच्या आरोग्याची काळजी करू लागली . काही नोकरदारांना नोकरी गमवावी लागली तर काहींना पगारकपात सहन करावी लागली . हातावर पोट असणाऱ्यांची दैना तर बघवत नव्हती पण सारेच परिस्थितीपुढे हतबल झाले .
सगळ्यांच्या मनात नकारात्मक विचारांचं जणू थैमान सुरु झालं कारण बाहेर सकारात्मक वाटेल असं वातावरणच नव्हतं … त्या मुळेच सकारात्मक विचारांच्या प्रसारासाठी मग रेडिओ जयंत चा प्रवास सुरू झाला.
जयंत ठोमरे
सकारात्मकतेच्या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद
व्य क्त -अव्यक्त या साहित्य रसिकांसाठी च्या कार्यक्रमात लेखक कवी सी एल कुलकर्णी लिखित मेघावळ हा काव्य ललित संग्रहाचे सादरीकरण तसंच अनुभूती तल्या अनुभवांचं उत्तम सादरीकरण करण्यात आलं . याच बरोबर मराठी साहित्य जपण्यासाठी आणि त्याचा आबालवृद्धांनी आस्वाद घ्यावा यासाठी पुस्तक अभिवाचनातून उत्कृष्ठ पुस्तकांचं वाचन केलं जातं .आतापर्यंत प्रभू पाठक लिखित नर्मदा परिक्रमेवर आधारित बिल्वपत्र, सानेगुरुजी लिखित संस्कारक्षम श्यामची आई या पुस्तकांचं अभिवाचन केलं गेलं आणि आता लवकरच लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विचारवंत कै डॉ .यशवंत पाठक यांच्या मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन सुरु करण्यात येणार आहआहे .या सकारात्मक तेच्या संकल्पनेला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून अवघ्या काहीच महिन्यात हे चॅनेल हजारोंनी सबस्क्राईब देखील केले आहे.
आपल्या सकारात्मक विचारांचं लेखन किंवा आपल्या माहितीतल्या लेखकाचे लेखनसाहित्य लेखकाच्या पूर्वपरवानगीने सादर करण्याची सु वर्णसंधी देखील रेडिओ जयंत ने देऊ केली आहे.