क्रेडाई महाराष्ट्राचे दिमाखदार रौप्यमहोत्सवी वर्ष

Advertisements

ऑनलाइन वार्षिक सभेसाठी राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष सतीशदादा मगर यांची प्रमुख उपस्थिती.

क्रेडाई महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यव्यापी संघटना असून मुंबई वगळता महाराष्ट्रातील ५७ शहरांमध्ये जवळपास ३००० सभासद कार्यरत आहेत. या संस्थेची स्थापना होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष   राजीव परीख, मानद सचिव सुनील कोतवाल व  क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली.


या राज्यव्यापी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी कोविंड संकटामुळे ऑनलाइन आयोजित केली असून त्यामध्ये क्रैडाई नॅशनल या देशव्यापी संघटनेचे अध्यक्ष सतीश दादा मगर,उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया व कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर यांचे बांधकाम व्यवसायाशी निगडित विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. या सभेला राज्यभरातून एक हजार पेक्षा जास्त  सभासदांची नोंदणी झाली आहे.

महत्त्वांच्या  विषयावर चर्चा

सभेमध्ये नवीन बांधकाम नियमावली, स्टॅम्पड्युटी मधील सवलत, रेडीरेकनर मधील दरवाढ,जीएसटी मधील सवलती या महत्त्वांच्या  विषयावर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत.
क्रेडाई महाराष्ट्र या नामांकित बांधकाम व्यवसायिक संघटनेला महारेराकडून  सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन हा राज्यातील प्रथम मान प्राप्त झाला असून संघटनेमार्फत प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांसाठी सामोपचाराने तक्रार निवारण केंद्रे स्थापन केलेली आहेत.

कोव्हिडमध्ये भरीव कार्य

त्याचबरोबर कोव्हिड राष्ट्रीय संकटामध्ये सर्वच शहर संघटनांकडून सामाजिक बांधिलकीतून भरीव कार्य केले असून निसर्ग वादळ व पूरपरिस्थिती वेळी सभासदांकडून क्रेडाई सभासदांकडून आपत्ती निवारणाचे मोठे कार्य केले गेले आहे.

सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार

वार्षिक सभेमध्ये मागील पंचवीस वर्षांमध्ये संघटना उभारणीचे कार्य केलेल्या व संघटनेच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असलेल्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करावयाचे ठरले असून  त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष रामकुमार राठी, जितेंद्र ठक्कर, रामचंद्र पाटणकर, राजिंदरसिंह जबिंडा. किशोर चांडक, संतदास चावला, सतीशदादा मगर, अनंत राजेगावकर, प्रशांत सरोदे, शांतीलाल कटारिया या अध्यक्षांचा समावेश आहे. 

57 व्या नवीन सिटी चाप्टरचा समावेश

या प्रसंगी क्रेडाई समूहात शिरपूर (जिल्हा धुळे ) या 57 व्या नवीन सिटी चाप्टरचा समावेश हा एक मानाचा तुरा ठरणार आहे. सभेमध्ये मागील वर्षाच्या कार्याचा आढावा, वार्षिक बुलेटीन व सर्व शहरांची माहिती असलेले पुस्तिकेचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

या  वार्षिक सभेमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोचे  १५० हून अधिक  सभासद  सहभागी होणार असल्याची माहिती क्रेडाई  नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन व सचिव गौरव ठक्कर यांनी दिली आहे.

One thought on “क्रेडाई महाराष्ट्राचे दिमाखदार रौप्यमहोत्सवी वर्ष

Leave a Reply

You cannot copy content of this page